विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray राजकारणात काहीही होऊ शकते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जसे एकत्र आले तसे येत्या काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास सहकारी असलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.Uddhav Thackeray
महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे. 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत विजयी मेळावा घेतला होता. जवळपास 20 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले होते. त्या अनुषंगाने शिवसेनेचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येऊ शकतात,Uddhav Thackeray
प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
सध्या आमदारांचे वादग्रस्त व्हिडिओ समोर येत आहेत. यावर देखील प्रताप सरनाईक म्हणाले, आमच्या पक्षातील आमदारांकडून काही विधाने करण्यात आले, त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. शिंदेंनी आमदारांना सक्त सूचना देखील दिल्या आहेत. आमच्याच आमदारांच्या तक्रारी आहेत असे नाही. सगळ्या पक्षातील आमदार बोलतात.
उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर चांगलाच हल्लाबोल केला होता. जादूटोणा करून आमदार निवडून आले, असे त्यांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना प्रताप सरनाईक म्हणाले, तुमचे आमदार निवडून आले हे काय जादूटोणा न करता आले? आणि आमचे जादूटोणा करून आले का? तुमचे लोकसभेला खासदार जादूटोणा करूनच निवडून आले होते का? . एकनाथ शिंदे शिवसेनेचे ब्रँड आहेत. आमच्या पक्षाचा ब्रँड म्हणजे एकनाथ शिंदे.
प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदे यांचे खास मानले जातात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपबरोबर जाऊ अशी विनंती त्यांनी केली होती.
A senior minister of the Shinde group says.. Uddhav Thackeray and Eknath Shinde can also come together.
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Devendra Fadnavis मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीमुळे आयटी, स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Ashish Shelar महाराष्ट्राचा गौरव गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
- बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार