विशेष प्रतिनिधी
मुंबई : Adequate Supply आखाती देशात युद्ध सुरू असले तरी राज्यात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांनी भीतीपोटी साठा करु नये, असे आवाहन राज्य सरकारने सोमवारी नागरिकांना केले. रेशनिंग नियंत्रक आणि संचालक चंद्रकांत डांगे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.Adequate Supply
रेशनिंग नियंत्रक आणि संचालक चंद्रकांत डांगे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत गॅससाठा तसेच इंधनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, राज्यातील पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. राज्यातील 8 हजार 126 पेट्रोल पंपांना पुरवठा करण्यासाठी तेल कंपन्या तत्पर आहेत. सरकारी तेल कंपन्यांचे राज्यात 24 डेपो कार्यरत आहेत. या डेपोच्या माध्यमातून दररोज 18 हजार 500 किलोलिटर पेट्रोल आणि 40 हजार किलोलिटर डिझेल वितरीत केले जात आहे.Adequate Supply
1 ते 4 एप्रिल दरम्यानची सरासरी विक्री दररोज सुमारे 18 हजार 605 किलोलिटर पेट्रोल आणि 44 हजार 484 किलोलिटर डिझेल होती. ही विक्री जानेवारी ते मार्चमधील सरासरी विक्रीच्या बरोबरीने आहे. राज्यात घरगुती एलपीजी सिलिंडरचा साठा पुरेसा उपलब्ध असून ग्राहकांच्या बुकिंगनुसार डिलिव्हरी केली जात आहे.
मात्र, सर्व ग्राहकांना सिलिंडर मिळाला पाहिजे, या भावनेने बुकिंगसाठी कालावधी दिला आहे, असे डांगे यांनी सांगितले. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, स्मशानभूमी, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना 100 टक्के गॅस पुरवठा केला जात आहे. संरक्षण, रेल्वे, पोलीस, कारागृह आणि एसटी कँटीन 70 टक्के तर इतर निम-अत्यावश्यक क्षेत्रे आणि उद्योगांसाठी 20 टक्के पुरवठा केला जात आहे. स्थलांतरित मजुरांसाठी दररोज 27 हजार 600 सिलिंडर वितरीत केले जात आहेत, अशी माहिती डांगे यांनी दिली.
Adequate Supply of LPG, Petrol and Diesel Available Across the State
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर