विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025’ या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान साेहळ्यात स्वत: उपस्थित न राहता प्रतिनिधी पाठविल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच सुनावले आहे.Eknath Shinde
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यक्रमात राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचे आयाेजन करण्यात आले हाेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे या सन्मान साेहळ्याला उपस्थित हाेते. महाविकास आघाडीत असलेल्या शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यक्रमाला यायला नकार दिला.
महायुतीचा घटक असूनही एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली. शिंदे गटाचे प्रतिनिधी म्हणून प्रताप सरनाईक या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यावर नाराजी व्यक्त करताना अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे मला तुम्हाला सांगायचे आहे की, तुम्हाला यायला जमणार नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका. मी प्रताप सरनाईक यांच्यावर नाराज नाही. कारण आम्ही राष्ट्रवादीमध्ये एकत्र काम केले आहे. पण असंच सुरू राहिलं तर प्रत्येकजण प्रतिनिधी पाठवत जाईल. हा कार्यक्रम माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यासाठी आहे. 13 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व केलेल्याचा हा सन्मान आहे. त्यामुळे हा सन्मान ज्याचा आहे, तो त्यानेच स्वीकारला पाहिजे,
Ajit Pawar expressed his displeasure with Eknath Shinde for sending a representative to felicitate him
महत्वाच्या बातम्या
- Pakistan पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई; पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी
- Neelam Gorhe : पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना चौकशीचे निर्देश
- Sonu Nigam : सोनू निगमवर गुन्हा दाखल, कन्नडमध्ये गाणे गायचा आग्रह अन् म्हणाला यामुळेच पहलगाममध्ये युद्ध झालं…
- Ajit Pawar : तर अजित पवार, एकनाथ शिंदे हाेऊ शकतात मुख्यमंत्री… संजय राऊत यांचा दावा