विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई: Amit Thackeray नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विनापरवानगी अनावरण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी मनसे नेते अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नेरूळ पोलिसांचे पथक बुधवारी त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी गेले. मात्र अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी पोलिसांना सांगितले की, ते नोटीस स्वतः नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन स्वीकारतील. पण ते ठाण्यात नेमके कधी उपस्थित राहतील, याबाबत त्यांनी काहीही सांगितले नाही. परिणामी पोलिसांना नोटीस परत घेऊन नवी मुंबईला परतावे लागले.Amit Thackeray
राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या शिवस्मारकाचे अनावरण अमित ठाकरे यांनी मनसैनिकांसह परवानगीशिवाय केल्याचा आरोप आहे. पोलिसांनुसार, अनावरणावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक जमले होते. त्यावेळी मोर्चा काढण्यात आला आणि पोलिसांनी अडथळा आणल्यावर धक्काबुक्की झाली. याच गोंधळात पुतळ्याभोवती लावलेल्या सुरक्षा जाळ्यांचे नुकसानही झाले.Amit Thackeray
या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आणि सुमारे ४० मनसैनिकांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, परवानगीशिवाय मोर्चा काढणे, सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांशी धक्काबुक्की करणे आणि महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करणे या विविध कलमांनुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
नेरूळ पोलिसांकडून या प्रकरणातील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब गोळा करण्याचे काम सुरू आहे. आता अमित ठाकरे चौकशीसाठी कधी समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Amit Thackeray refuses to accept police notice in Nerul Shiv Smarak case
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : प्रो बैलगाडा लीग सुरू करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घाेषणा
- Sharad Pawar : काॅंग्रेसला ठाकऱ्यांचा नकाे हात, शरद पवारांची घेणार साथ
- संविधानिक संस्थांवर काँग्रेसच्या हल्ल्यांचा निषेध, २७२ माजी अधिकारी व न्यायमूर्तींचे खुले पत्र
- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य, नाेटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याचे न्यायालयाचे निर्देश



















