Amitabh Bachchan : ऑपरेशन सिंदूरसाठी अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले कौतुक

Amitabh Bachchan : ऑपरेशन सिंदूरसाठी अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले कौतुक

amitabh bachchan

विशेष प्रतिनिधी

मुंबई : “ है चिता की राख कर में, माँगती सिंदूर दुनिया “ .. आणि त्यांनी सिंदूर दिला. ऑपरेशन सिंदूर …अशा भावनिक शब्दांत महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. तू ना थमें गा कभी ; तू न मुड़ेगा कभी ; तू न झुकेगा कभी ..अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘पहलगाम दहशतवादी हल्ला’ यावर भावनिक शब्दांत पोस्ट लिहिताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोठेही नाव घेतले नाही. पण पतीच्या हत्येनंतर प्रतिशोधाची मागणी असणाऱ्या महिलांना मोदींनी ऑपरेशन सिंदूरची भेट कशी दिली याचे अंत्यंत हृदयद्रावक वर्णन केले आहे. हिंदीत लिहिलेल्या या पोस्टमध्ये आपले वडील प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेचा संदर्भ दिला आहे.

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ जणांची हत्या केली होती. धर्म विचारून पत्नीसमोर गोळ्या घातल्या होत्या. मलाही मारा अशी विनवणी करणाऱ्या पत्नीला नरेंद्र मोदींना जाऊन सांग असे म्हटले होते. याचा संदर्भ देत अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे

त्या राक्षसाने त्या निर्दोष नवरा-बायकोला ओढून बाहेर आणलं, पतीला निर्वस्त्र केलं, त्याच्या धर्माची खात्री करून घेतली आणि जेव्हा त्याला गोळी घालायला निघाला, तेव्हा पत्नीने गुडघ्यावर बसून, रडून रडून विनवण्या केल्या, “माझ्या नवऱ्याला मारू नको!” तरीसुद्धा त्या भेकड राक्षसाने अत्यंत अमानुषपणे त्याला गोळी घालून त्याच्या पत्नीला विधवा केलं!!

जेव्हा पत्नी म्हणाली – “मलाही मारा!”

तेव्हा राक्षस म्हणाला – “नाही!
तू जाऊन, ‘….’ ला सांग!”

त्या मुलीच्या मन:स्थितीत, पूज्य बाबूजींच्या कवितेतील एक ओळ आठवली :
समजा, ती मुलगी ‘….’ यांच्याकडे गेली आणि म्हणाली :

“ है चिता की राख कर में, माँगती सिंदूर दुनिया “ ..

तो “ …. “ ने
दे दिया सिंदूर !!!
OPERATION SINDOOR !!!

या पोस्टमध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले नसले तरी पतीच्या हत्येमुळे झालेल्या महिलांच्या दुःखावर फुंकर घालत दहशतवाद्यांचा आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी त्यांनीच ऑपरेशन सिंदूर राबविले. त्याचे कौतुक अमिताभ बच्चन यांनी केले आहे. शेवटी त्यांनी म्हटले आहे की …

जय हिन्द
जय हिन्द की सेना
तू ना थमें गा कभी ; तू न मुड़ेगा कभी ; तू न झुकेगा कभी
कर शपथ , कर शपथ, कर शपथ !
अग्नि पाथ! अग्नि पाथ ! अग्नि पाथ !!!

२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. त्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी केंद्रांवर लक्ष्यभेदी हल्ले केले.

Amitabh Bachchan praises Prime Minister Narendra Modi for Operation

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023