विशेष प्रतिनिधी
मुंबई ,:Amol Mitkari राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आता ‘हीच हाक्याची औकाद’ असे म्हणत अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप समोर आणली आहे.Amol Mitkari
अमोल मिटकरी यांनी एक ऑडिओ क्लिप शेअर करत हाके यांनी विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना उभे करून तोडपाणी केली. अशोक चव्हाण यांच्या मुलीला निवडून आणण्यासाठी हाके यांनी दबाव टाकून ओबीसी उमेदवाराला उमेदवारी मागे घ्यायला लावली असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अमोल मिटकरींनी त्यांच्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप शेअर करत म्हटले की, “सदर ऑडिओ ही भोकर मतदारसंघातील आहे. याच मतदारसंघात एका ओबीसी बांधवाचा राजकीय बळी देऊन हाक्याने आर्थिक देवाण-घेवाण केली आणि अर्ज मागे घ्यायला भाग पाडले. आता या मतदारसंघात आर्थिक तडजोड किती मोठी झाली असेल हे सुज्ञास सांगणे न लगे”.
काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?
ऑडिओ क्लिपमध्ये कुंटे यांनी कॉल केल्यावर, ‘जय ओबीसी म्हणत, माझ्या पक्षाकडून नामदेव हिलवाड यांना एबी फॉर्म दिला होता. त्यांना उभं केलं होतं. पण त्यांनी विड्रॉल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, लक्ष्मण हाके यांचा माझ्यावर दबाव आहे. जरांगे पाटील यांनी विधानसभा लढवण्यापासून माघार घेतली.
हा निर्णय घेतल्यावर हाके साहेबांशी बोलणे झाल्यावर फॉर्म मागे घेतला. पण हाके यांच्या म्हणण्यानुसार, आपण माघार घेतलेली नाही, आपण आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यांची काही अडचण असेल, पण माझा संबंध नाही, मी कसा दबाव आणू शकतो. एवढेच बोलणे आटोपल्यावर हाकेंनी, मी बोलतो..म्हणत फोन कट केला.
Amol Mitkari alleges that Laxman Hake tampered with the assembly elections
महत्वाच्या बातम्या
- Kumar Vishwas पाकिस्तानला महिलांची ताकद दाखवून दिली, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सोहळ्यात कुमार विश्वास यांचे प्रतिपादन
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावच्या रिंगणात, बिनविरोध निवड होऊ देणार असल्याचा विरोधकांचा इशारा
- Narendra Modi : गोळीला आता गोळ्याने उत्तर मिळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
- Sanjay Raut : जे भाजपाला ‘चंदा’ देतील त्यांचा धंदा जोरात, संजय राऊत यांची टीका