विशेष प्रतिनिधी
मुंबई:Amol Mitkari दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला अडीच महिने उलटूनही तपासाचे सत्य अद्याप समोर आले आहे. आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. “अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी मी एकटाच पायऱ्यांवर बसलो, पण दुर्दैवाने इतर आमदारांची हवी तशी साथ मिळाली नाही,” अशी खंत व्यक्त करत अमोल मिटकरींनी आता ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलनाची हाक दिली आहेAmol Mitkari
मिटकरी यांनी एका ‘लाईव्ह’ संवादातून आपल्या मनातील सल बोलून दाखवली. ते म्हणाले, “अधिवेशनाच्या काळात शंभुराज देसाई यांच्या साताऱ्याच्या प्रकरणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ४० आमदार एकत्र आले. मात्र, मी जेव्हा अजितदादांच्या अपघाताच्या तपासासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला बसलो, तेव्हा विनंती करूनही कुणीही आले नाही. जर त्यावेळी सर्व आमदार एकवटले असते, तर आज तपासाचे चित्र वेगळे असते. दुर्दैवाने आम्ही ती वेळ गमावली.”Amol Mitkari
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी १५ दिवसांत ब्लॅक बॉक्सचा डेटा जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते, मग अडीच महिने झाले तरी तो डेटा समोर का आला नाही? विमानतळावरील गेट नंबर ८ पासून विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज का लपवले जात आहेत? विमानात ५ प्रवासी होते की ६, हे सरकारने स्पष्ट करावे,” अशी मागणी त्यांनी केली.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) भूमिकेवरही अमोल मिटकरींनी संशय व्यक्त केला. प्राथमिक अहवालात अपघातस्थळी झाड असल्याचे दाखवण्यात आले आहे, मात्र प्रत्यक्षात तिथे कोणतेही झाड नव्हते, असा दावा त्यांनी केला. तसेच, पायलट कोण होता आणि विमानात नेमके किती लोक होते, याचा उलगडा अद्याप का झाला नाही? असा सवाल करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
मिटकरी आता जनतेचे न्यायालय गाठणार आहेत. त्यासाठी त्यांनी राज्यभर ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलनाची घोषणा केली आहे. आगामी काळात जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर यात्रा काढली जाईल. प्रत्येक ग्रामसभेत या प्रकरणाच्या चौकशीचा ठराव मंजूर करून तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. अजितदादांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा निर्धार अमोल मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
Amol Mitkari Calls for ‘Justice for Dada’ Protest
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर