विशेष प्रतिनिधी
मुंबई : Amol Mitkari आपल्या कार्यकर्तृत्त्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगली आहे बर का! उगाच खेटे घेऊ नका राधेकृष्ण असा धमकीवजा इशारा राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमाेल मिटकरी यांनी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांना दिला आहे.Amol Mitkari
अजित पवार जनाची नाही तर मनाची तर ठेवा, अशी टीका राधाकृष्ण विखे- पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली हाेती. यावरून अमाेल मिटकरी यांनी विखे- पाटलांना हा इशारा दिला आहे. अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, भाजपचे वरिष्ठ नेते आपली दखल घेतीलच विखे पाटील विसरले असावेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे. अजितदादांवर टीका करताना जरा जपून !अपेक्षा आहे भाजपश्रेष्ठी याची दखल घेतील. बाकी विखे पाटीलजी आपल्या कार्यकर्तृत्त्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगली आहे बर का! उगाच खेटे घेऊ नका #राधेकृष्ण, असा इशाराही त्यांनी दिला.Amol Mitkari
शरद पवार यांच्यावरती टीका करत असतानाच राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला हाेता. ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी इथेनॉल धोरण लागू करून कारखान्याला जीवदान दिले त्यांचे कारखान्याच्या सभेत अभिनंदनाचे बॅनर फोटो तरी लावा. जनाची नाही तर मनाची लाज ठेवा, असे ते म्हणाले हाेते.
Amol Mitkari Issues Threat-Like Warning to Radhakrishna Vikhe Patil, Says “Your Deeds Are the Talk of Mantralaya”
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला