विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे मंत्री म्हणून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. यावेळी यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचे की नाही असा प्रश्न आपल्याला पडला असल्याचे म्हटले आहे.
दमानिया म्हणाल्या आहेत की, “वाह फडणवीस वाह, म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही? असा काय नाईलाज आहे? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात?” असा सवाल त्यांनी विचारला आहे. “हेच भुजबळ जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा एक अगदी बिचाऱ्यासारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जात होता. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत? किळस वाटते महाराष्ट्राच्या राजकारणाची.
“मला जेव्हा कळले छगन भुजबळ यांचा शपथविधी होत आहे. तेव्हा मला खूप राग आला. भुजबळ यांच्या विरोधात मी लढले आहे. त्यांच्यावर एफआयआर झाली, त्यांनी अडीच वर्षे तुरुंगात काढली. ते बाहेर येत असताना आम्ही धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढलो. धनंजय मुंडेंची दहशत बाहेर काढली. धनंजय मुंडे गेल्यानंतर परत त्या जागेवर भुजबळांना जर तुम्ही संधी देत असाल तर असा त्रास जनतेला का देत आहात? आमच्या सारखा लोकांना त्रास देतात, जे भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत. तुम्ही आम्हाला संदेश देता का की आमचे तुम्ही काही बिघडवू शकत नाही. मला खरा हा प्रश्न पडला आहे, की हा लढा पुढे चालू ठेवू की नाही?” असे म्हणत अंजली दमानिया यांनी आपला राग व्यक्त केला.
Anjali Damania is angry that Chhagan Bhujbal has become a minister again
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स रेडची धमकी देत मागितली एक कोटींची खंडणी
- Gaja Marane : गजा मारणे टोळीला पोलिसांचा दणका, १५ अलिशान गाड्या जप्त
- Indraprastha Vikas Paksha : दिल्लीत ‘आप’ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांचा राजीनामा, ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ची घोषणा
- Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर