विशेष प्रतिनिधी
मुंबई : Anjali Damania काही दिवसांपासून सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाच्या कंपनीच्या नफेखोरीवरून निशाणा साधत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गडकरींच्या कुकर्माची मालिका जाहीर करण्याचा इशारा दिला आहे.Anjali Damania
अंजली दमानिया यांनी मंगळवारी सकाळी एका ट्विटद्वारे नितीन गडकरी यांचा मुलगा दिवसाकाठी तब्बल 144 कोटी रुपयांनी श्रीमंत होत असल्याचा दावा केला होता. बुधवारपासून आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पोलखोल मालिका सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्या विरुद्ध पोल खोल करायला सुरवात करणार आहे. त्यांच्या सगळ्या कुकर्मांची पूर्ण मालिकाच सुरू करणार आहे, असे त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.Anjali Damania
नितीन गडकरींनी काही दिवसांपूर्वीच माझ्या बुद्धीचे मूल्य प्रत्येक महिन्याला 200 कोटी रुपये इतके आहे, असे विधान केले होते. अंजली दमानिया यांनी त्यांच्या या विधानाचा दाखला देत आज म्हणाल्या होत्या की, गडकरी म्हणतात की, त्यांना पैशांची गरज नाही. त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. त्यांच्या मेंदूचे मूल्य दर महिन्याला 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. खरेतर त्यांनी स्वतःला खूप कमी लेखले आहे. कारण, गडकरींचे सुपुत्र दररोज 144 कोटी रुपयांनी श्रीमंत होत आहेत.
आपल्याला माहिती आहे की, गडकरींच्या मुलाची सियान अॅग्रो नामक कंपनी आहे. 25 जून रोजी सियान अॅग्रोमध्ये 1,89,38,121 प्रमोटर होल्डिंग शेअर्स होते. या शेअरच्या किंमतीत आज 76 रुपयांची वाढ झाली. म्हणजेच एका दिवसात 143.92 कोटी रुपये त्यांनी कमावले. निखील व सारंग गडकरी दिवसाला इतके पैसे कमावत आहेत, असे दमानिया म्हणाल्या.
Anjali Damania targets Nitin Gadkari, warns that she will expose his misdeeds
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















