विशेष प्रतिनिधी
मुंबई : Anurag Kashyap प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याने ब्राह्मण समाजावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर टीका, ट्रोलिंग आणि कायदेशीर कारवाईच्या मागणीनंतर अनुरागने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत माफीनामा जाहीर केला आहे. मात्र, त्याने स्पष्ट केलं की, ही माफी संपूर्ण पोस्टसाठी नसून फक्त त्या एका ओळीसाठी आहे, जी त्याच्याच मते ‘आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट’ काढून वापरली जात आहे.Anurag Kashyap
हा सगळा वाद सोशल मीडियावर झाला.एका सोशल मीडिया वापरकर्त्याने अनुराग कश्यपला उद्देशून लिहिलं होतं :ब्राह्मण तुमचे बाप आहेत. जितकं तुम्ही त्यांच्याशी वाकडं घ्याल, तितकंच ते तुम्हाला जाळतील.त्याला उत्तर देताना अनुराग कश्यपने लिहिलं :”ब्राह्मणावर मी मुतीन… काही प्रॉब्लेम?”
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
या विधानावरून सोशल मीडियावर मोठा गदारोळ उठला. अनेकांनी त्याला जातीद्वेष पसरवणारा, महिलांविषयी असंवेदनशील आणि सामाजिक तणाव निर्माण करणारा ठरवलं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
अनुरागने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे: ही माझी माफी आहे. त्या संपूर्ण पोस्टसाठी नाही, तर फक्त त्या एका ओळीसाठी आहे जी आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट काढून द्वेष पसरवण्यासाठी वापरली जात आहे. कोणतंही विधान माझ्या कुटुंबाला, मुलीला, मित्रांना मिळणाऱ्या बलात्कार आणि खुनाच्या धमक्यांपेक्षा मोठं नाही. बोललेले शब्द परत मागे घेतले जाऊ शकत नाहीत आणि मी ते घेणारही नाही.माझं कुटुंब कधीच काही बोलत नाही. म्हणूनच, जर माझ्याकडून माफी हवी असेल, तर घ्या – माझी माफी.”
प्रतिक गांधी आणि पत्रलेखा यांच्या ‘फुले’ सिनेमाच्या सेन्सॉर वादात अनुराग कश्यपने उडी घेतली होती. जातव्यवस्थेच्या वास्तवावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने अडथळे आणले, यावरून तो संतापला होता. याच पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजाविषयी वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप त्याच्यावर झाला आहे.
यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर #BoycottAnuragKashyap ट्रेंड होऊ लागला. अनेकांनी त्याच्या विधानाला जातीद्वेष पसरवणारे ठरवत त्याला कठोर कारवाईची मागणी केली. भाजपचे नेते आणि ‘बिग बॉस’ फेम तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी देखील अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
माफी मागतानाही अनुरागने आपल्या शैलीत सडेतोड भूमिका घेत ब्राह्मण संस्कृतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ब्राह्मण लोक, महिलांना सोडा – एवढं तरी शिका. हे केवळ मनुवादात नाही, शास्त्रातही आहे. तुम्ही कोणते ब्राह्मण आहात, ते आधी ठरवा.
अनुराग कश्यपवर 295(A), 153 आणि आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर तपास यंत्रणांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली, तर त्याला अटक टाळणं कठीण होऊ शकते, असे म्हणतात.
Anurag Kashyap’s apology after controversial statement on Brahmins, saying he will not take back his words, but apologize if he wants to
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
- Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव
- Raj Thackeray : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती नको, राज ठाकरे यांची भूमिका
- MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना