विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रासाठी मी आणि राज ठाकरे देखील एकत्र आलो आहेात. आमच्या डोळ्यासमोर संयुक्त महाराष्ट्र तोडला जात असेल तर आम्ही घरात गप्प बसणार नाही. आम्ही या विरोधात उभे राहणार. जो कोणी मराठी माणसाच्या विरोधात जाईल, त्याच्या विरोधात आम्ही उभे राहणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलन देखील गिरणी कामगारांनी आपले रक्त सांडले होते. त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना देखील गुडघ्यावर आणण्याचे काम गिरणी कामगारांनी केले होते. आता दिल्लीतील दोघांसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. आता तीच कोंबडी ते कापायला निघाले आहेत. महाराष्ट्रासाठी मी आणि राज ठाकरे देखील एकत्र आलो आहेात.
आम्ही एकत्र कशासाठी आलो? आम्ही देखील आमची राजकीय पोळी भाजत बसलो असतो. मात्र प्रबोधनकारांचे नातू आणि शिवसेनेचा प्रमुखांचे मुले महाराष्ट्रासाठी एकत्र आले आहेत. माझे आजोबा आणि वडील संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते. आमच्या डोळ्यासमोर संयुक्त महाराष्ट्र तोडला जात असेल तर आम्ही घरात गप्प बसणार नाही. आम्ही या विरोधात उभे राहणार. जो कोणी मराठी माणसाच्या विरोधात जाईल, त्याच्या विरोधात आम्ही उभे राहणार.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
ठाकरे म्हणाले, मुंबईतील धारावीची जागा अदानीच्या घशात घातली जात आहे. मुंबईतील इतर जागा देखील अदानीला दिल्या जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ज्यांनी मुंबई उभे केली, त्यांना तुम्ही मुंबईच्या बाहेर जागा देणार आहात का? सर्व गिरणी कामगारांना धारावी मध्ये जागा मिळायला हवी. धारावीमध्ये गिरणी कामगार, पोलिस कर्मचारी, सफाई मजूर या सर्वांना मुंबईमध्येच हक्काची जागा देण्याची मागणी करताना ठाकरे म्हणाले, दुर्दैवाने आपले सरकार आले नाही. मात्र आपले सरकार आले असते तर धारावीमध्ये हक्काची जागा तुम्हाला मिळालीच असती.
शिक्षक एकत्र उभे राहिले तर आम्ही सर्व मिळून शिक्षकांचा हक्क त्यांना मिळून दिल्याशिवाय राहणार नाही. पितृदेवो भव, मातृदेवो भव आणि गुरु देवो भव, असे आपण म्हणतो. मात्र सत्तेवर बसलेल्यांसाठी त्यांचे गुरु दिल्लीत बसलेले आहेत, असा आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना पूर्ण ताकतीने तुमच्या सोबत राहील. मी पुन्हा येईल, असे पण आता हा शब्द बदनाम झाला आहे. मात्र मी वाचन देतो की, तुमच्यासोबत राहिल. लवकरच विजयाचा उत्सव देखील आपण इथेच साजरा करू, असे मी आपल्याला वचन देतो .
Anyone Who Acts Against Marathi People, We Will Oppose Them: Uddhav Thackeray’s Stern Warning
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी