विशेष प्रतिनिधी
मुंबई : आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता का गंज लागला मला माहिती नाही. कदाचित सध्या बुद्धीचा वापर करता येत नसल्यामुळे गंज लागला असेल. कारण सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी त्यांना चांगलं मंत्रीपद दिलं नाही, कदाचित त्यामुळे असेल, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
आशिष शेलार पत्रकार परिषदेत म्हणाले हाेते की राज ठाकरेंनी दुबार मतदारांच्या ज्या याद्या दाखवल्या ते मतदार हिंदूच होते. त्यावर पलटवार करताना संदीप देशपांडे म्हणाले की, आशिष शेलार यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतो. एकतर सध्या भाजपमध्ये शेलारांना कुणी विचारत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना जे खातं दिलं आहे, त्या खात्यात दम नाही. त्यामुळे त्याचं जे वजन असायला हवं ते नाही. मुंबई प्रदेशाध्यक्ष पदही गमावलं आहे. तिथेही कुणी विचारत नाही. त्यामुळे आपण चर्चेत राहिलो पाहिजे या उद्देशाने आजची त्यांची पत्रकार परिषद होती.
आशिष शेलारांनी ज्या पद्धतीने मांडलं की, जो गठ्ठा दाखवला. फक्त हिंदू मतदारच दुबार दाखवले. तो गठ्ठा बघायला आशिष शेलार आले होते का? हिंदू मतदार आहेत की, मुस्लीम मतदार आहेत. ख्रिश्चन मतदार आहेत की, जैन मतदार आहेत, हे बघायला आशिष शेलार तिकडे आलेले का? आशिष शेलारांना हे कुणी सांगितलं की त्यात फक्त हिंदू मतदारच आहेत. आमच्या दृष्टीने दुबार मतदार म्हणजे दुबार मतदारच. मग तो ना हिंदू आहे, ना मुस्लीम, ना शीख, ना ख्रिश्नन\”, असेही संदीप देशपांडे म्हणाले.
प्रचंड मोर्चामुळे भाजप घाबरलेला आहे. आशिष शेलार बावचळले आहेत. त्यामुळे शेलार पुढे आले आहेत. मूळात ते या गोष्टीशी सहमत आहे की, दुबार मतदार आहे. मग आमचं त्यांना म्हणणं आहे की जर दुबार मतदार असतील, तर ते बाद झाले पाहिजेत. तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. या मागणीशी शेलार सहमत आहेत का, ते त्यांनी सांगावे. शेलारांच्या बुद्धीला गंज लागलाय, कारण..आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता का गंज लागला मला माहिती नाही. कदाचित सध्या बुद्धीचा वापर करता येत नसल्यामुळे गंज लागला असेल. कारण सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी त्यांना चांगलं मंत्रीपद दिलं नाही, कदाचित त्यामुळे असेल. माझा आशिष शेलारांना प्रश्न आहे की, जी यादी आम्ही दुबार मतदारांची दाखवली, त्यात हिंदूच मतदार आहेत, आणि दुसरे नाहीत, हे शेलार कशाच्या आधारावर बोलत आहेत?
Ashish Shelar’s intellect is tarnished by not having a good ministerial post, Sandeep Deshpande counterattacks
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















