विशेष प्रतिनिधी
नांदेड: औरंगजेबाची कबर काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आली आणि ती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या संरक्षणाखाली आहे. कबरीला कायदेशीर संरक्षण आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. Devendra Fadnavis
औरंगजेब हा धर्मांध, क्रूर शासक आणि या देशाचा लुटारू होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या, छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाच्या कबरीचे या महाराष्ट्रात उदात्तीकरण, दैवतीकरण सुरू आहे. त्याचे इथे उरूस भरवले जात आहेत हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी औरंगजेबाची ही कबरच उखडून टाकली पाहिजे असे मत छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. Devendra Fadnavis
यावर बोलताना फडणवीस म्हणाले, औरंगजेबाची कबर काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आली आणि ती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या संरक्षणाखाली आहे. कबरीला कायदेशीर संरक्षण आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. घाईघाईने कोणतेही पाऊल उचलता येणार नाही. आम्हालाही प्रत्येकाला असंच वाटतं. फक्त काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात. कारण ती कबर संरक्षित आहे. काँग्रेसच्या काळात त्या कबरीला एएसआयचं (ASI) संरक्षण मिळालेलं आहे.
27 वर्षे मराठ्यांशी लढणारा औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे झाला. त्यावेळी तो 89 वर्षांचा होता. 1707 मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या इच्छेनुसार त्याच्या गुरूच्या कबरीजवळच आपली कबर बांधण्यात आली. सुफी संत शेख झैनुद्दीन दर्गा परिसरातच त्याची कबर आहे. त्यासाठी त्यावेळी 14 रुपये 12 आणे इतका खर्च करण्याची ताकद त्याने मृत्यूपत्रातच दिली होती. खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे.
Aurangzeb’s tomb was protected during the Congress government, alleges Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल