Bharat Gogavale : पालकमंत्रिपद मिळू नये यासाठी अघोरी पूजा केल्याचा आरोप, भरत गोगावले यांचा पलटवार

Bharat Gogavale : पालकमंत्रिपद मिळू नये यासाठी अघोरी पूजा केल्याचा आरोप, भरत गोगावले यांचा पलटवार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आपण केलेली कोणतीही अघोरी पूजा नव्हती तर ती एक साधी पूजा होती. मला जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळू नये आणि आपण अडचणीत यावे, म्हणून हे असे माझ्यावर आरोप केले जात असावेत, असा आरोप रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.



शिवसेना शिंदे गटाचे नेते असलेले भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी मांत्रिकांना बोलावून अघोरी पूजा केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी केला होता. त्यानंतर महायुतीमधीलच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी भरत गोगावले यांचा पूजा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.
भरत गोगावले यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, “मी प्रामाणिकपणे काम करत आहे. ती कोणतीही अघोरी पूजा नव्हती तर ती एक साधी पूजा होती. मला जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळू नये आणि आपण अडचणीत यावे, म्हणून हे असे माझ्यावर आरोप केले जात असावेत. आमच्या घरी रोज जनता दरबार असतो. मी ग्रामीण भागातील मंत्री असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकं सकाळी लवकर येत असतात. जो कोणी अशी अघोरी विद्या करत असेल तो असे व्हिडिओ काढेल का?”
गोगावले म्हणाले की, “आम्ही कुठे देवदर्शनाला गेलो की ती अघोरी विद्या आणि तुम्ही कुठे गेलात तर ते काय नसते. ज्याला कर नाही त्याला डर नसावे. ज्याची नियत चांगली आहे, त्यांनी कधी घाबरायचे नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीतील मावळे आहोत. आम्ही कधी चुकीचे करणार नाही.

आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणताही विचार न करता बाहेर पडलो, ते उबाठाला झोंबले आहे. त्यानंतर पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादीला झोंबत असेल. त्यामुळे विरोधक आमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आणखी शोधात बसावे. आम्ही धार्मिक लोकं आहोत, आम्ही स्वच्छ मनाचे लोकं असल्यामुळेच आम्हाला लोकांनी चार चार वेळा निवडून दिले आहे, असेही गोगावले म्हणाले.

 

Bharat Gogavale hits back at allegations of performing Aghori puja to prevent him from getting the guardian minister post

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023