विशेष प्रतिनिधी
मुंबई: Bhaskar Jadhav कोणाला किती पैसे द्यायचे हे अर्थमंत्री कसा ठरवू शकतो? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी निधीचा मुद्दा उपस्थित करत अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.Bhaskar Jadhav
विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात बोलताना भास्कर जाधव म्हणाले, राज्याचा नियमित अर्थसंकल्प मार्च महिन्यात मांडला गेला, आणि पुन्हा 57 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मागितल्या गेल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी 7 लाख 75 हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडला, मात्र अजूनही 2 अधिवेशन यंदाच्या वर्षात बाकी आहेत. अशात दोनदा पुरवणी मागण्या घेऊन येतील, तुटीचा अर्थसंकल्प मांडायला लागले आहेत. एकीकडे आम्हाला निधी मिळत नाही, अजित दादा अर्थमंत्री आहेत, मला त्यांचा आदर आहे. पण, संगमेश्वरला ते आले असताना गुहागर येथे छत्रपतींचा पुतळा उभारण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मागितला होता. मात्र, त्यांनी साधा होकार देखील दिला नाही. मला जेवणाचे निमंत्रण होते. पण, असंख्य इंगळ्या डसल्या, कोण जेवणार तुमचे जेवण?
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
जाधव म्हणाले, भाजपवाले अर्थ खात्याबद्दल तक्रारी करत आहेत, शिवसेनावाले तर आधीपासूनच तक्रारी करत होते, असा अर्थसंकल्प असत नसतो. राज्याच्या तिजोरीवर कर्ज होतंय, ज्याने कर्ज काढलेले नाही त्याच्या डोक्यावर कर्ज आहे. बोलून बोलून काय कराल, निधी देणार नाही, अरे तो तसाही तुम्ही देत नाहीत.
कोणी एकाने चालवणारं हे खातं नाही. 7 लाख 75 हजार कोटींचा अर्थसंकल्प हा 8 लाख 15 हजारांवर घेत, 1 लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर केला गेला आहे. सध्या, जीएसटीवर तुमचं सर्व सुरु आहे, जीएसटी नसता तर काय होईल, असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.
भास्कर जाधव म्हणाले, एखादी आपत्ती आली, पाऊस पडला, तर पैसे कुठून आले? राखीव निधीसाठी सभागृहासमोर यावे लागले. गृह विभागावर बोलत असताना मी कृषी विभागावरही बोलतो. बाब क्रमांक 3, आशिषजी तुमच्याकडे कृषी आहे ना? आपले कृषी मंत्री आहेत कुठे? वरच्या सभागृहात काय? चाक बिक पडतेय काय? म्हणून येत नाहीत? असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.
नितेश राणे यांच्यावर टीका करताना भास्कर जाधव म्हणाले, लोकांना शिव्या देता, त्यातून मुख्यमंत्र्यांची शाबासकी मिळवता. त्याऐवजी ड्रेझरसाठी हट्ट करा आणि कोकणाला मदत करा. बाहेर जाऊन तुम्ही मला शिव्या द्याल, काही हरकत नाही. माझ्यासमोरच ही लहानाची मोठी झाली आहेत, आता काय ती मोठ्ठीच झालीत.
Bhaskar Jadhav attacks Ajit Pawar on the issue of funds
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी