विशेष प्रतिनिधी
मुंबई : निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावरून भाजपचा महाराष्ट्रद्वेष पुन्हा एकदा उघड झाला आहे असा हल्लाबोल करत भाजप त्यांच्या खासदारांवर काही कारवाई करणार का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. Aditya Thackeray
आदित्य ठाकरे म्हणाले, निशिकांत दुबे उत्तर भारतीय नाहीत. ते भाजप खासदार आहेत आणि ही भाजपची मानसिकता आहे. उत्तर भारत असा नाही. उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, देशभरातून लोक स्वप्ने घेऊन महाराष्ट्रात येतात. हा भाजपचा खेळ आहे की ते फोडा आणि राज्य करा. आमचा लढा सरकारविरुद्ध होता, कोणत्याही भाषेविरुद्ध नाही. आमचा लढा भाजपच्या सत्तेविरुद्ध होता, जो हिंदीच्या सत्तेविरुद्ध होता, कोणत्याही भाषेविरुद्ध नाही. मी हेच म्हणू इच्छितो की निशिकांत दुबे हे उत्तर भारताचे प्रतीक नाहीत असे लोक आहेत जे आग लावू इच्छितात. जर तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही तर त्यांचे राजकारण चालणार नाही. Aditya Thackeray
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
भाजप खासदाराच्या वक्तव्यामागे बिहार आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचा भाजपचा फोडा आणि राज्य करा असा खास खेळ आहे, असा आरोप करून आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राविषयी मनात खोलवर असलेला द्वेष हे भाजपचे सत्य आहे. भाजपला फक्त द्वेष, विष कालवणे, समाजांमध्ये तेढ निर्माण करणे यावरच निवडणुका जिंकता येतात. त्यांना कधीही शांततेच्या मार्गाने किंवा विकासाच्या मुद्यांवर निवडणुका जिंकता येत नाही.
पुढच्या काही दिवसांत भाजपचे पाळलेले ‘डमी’ लोक महाराष्ट्र, मराठी, आणि आपल्या संस्कृतीविषयी द्वेषपूर्ण बोलतील, जेणे करून आपण चिडून त्यांच्या या जाळ्यात अडकावे. भाजपच्या या डमी लोकांकडून मराठी आणि महाराष्ट्राविषयी जाणीवपूर्वक द्वेष पसरवला जाईल, जेणेकरून मराठी समाज आणि एखाद्या विशिष्ट समुदायात फूट पाडता येईल, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. ही भाजपच्या राजकारणाची पद्धत आहे. भाजपने या दोन व्यक्तींवर कारवाई केली नाही, तर भाजपला महाराष्ट्राचा खरोखरच द्वेष आहे, हे निश्चित होईल, अशी भीतीही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
BJP’s hatred of Maharashtra exposed once again, Aditya Thackeray’s attack on Nishikant Dubey’s statement
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी