Rohit Pawar : अजितदादांच्या घराबाहेर काळी जादू, काही नेत्यांनी करंगळी कापली, रोहित पवार यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Rohit Pawar  अजित पवार जिवंत असताना त्यांच्या घराबाहेर ‘काळी जादू’ करण्यात आली होती आणि काही नेत्यांनी आपली करंगळी कापली होती, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.Rohit Pawar

रोहित पवार यांनी यावेळी जादूटोणा आणि भोंदूगिरीच्या अंगाने गंभीर आरोप केले. “अजित दादा जिवंत असताना त्यांच्या मुंबईतील आणि बारामतीतील घराबाहेर ‘ब्लॅक मॅजिक’ करण्यात आली होती. दादांचे पद मिळावे आणि त्यांची ताकद कमी व्हावी या हेतूने काही नेत्यांनी चक्क आपली करंगळी कापल्याचेही समोर आले आहे. अशोक खरात प्रकरणाशी याचे धागेदोरे जुळतात का, हे तपासणे गरजेचे आहे. सत्तेसाठी कोणी कोणी हा अघोरी प्रकार केला, हे लवकरच स्पष्ट होईल,” अशी मागणीही त्यांनी केली.Rohit Pawar



महाराष्ट्रात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मृत्यूला दोन महिने उलटूनही पोलिस एफआयआर दाखल करत नाहीत, हे दुर्दैव आहे. अखेर राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार आम्ही कर्नाटक गाठले आणि तिथे ‘झिरो एफआयआर’ नोंदवून तो राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे वर्ग केला आहे,” अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. ते म्हणाले, “आम्ही मरीन ड्राईव्ह, बारामती पोलिस आणि सीआयडीकडे वारंवार खेटे घातले, पण गुन्हा नोंद झाला नाही. साधी चप्पल चोरीला गेली तरी एफआयआर होतो, मग राज्याच्या नेत्याच्या बाबतीत इतकी दिरंगाई का? आम्ही राहुल गांधींना भेटलो, ते म्हणाले ज्या राज्यात न्याय मिळू शकतो अशा राज्यांत जावा, गवई साहेबाचे उदाहरण आहे. कर्नाटकात दादांच्या अपघातानंतर गुन्हा दाखल झाला, मी त्या राज्याचे आभार मानतो. मी फक्त कर्नाटकात गेलो, तिथे एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ०० ने तो तपासासाठी महाराष्ट्राकडे पाठवला आहे.”

Black Magic Outside Ajit Pawar’s Residence, Leaders Cut Fingers: Rohit Pawar Alleges

महत्वाच्या बातम्या