विशेष प्रतिनिधी
मुंबई : Andhare and Damania अशोक खरात प्रकरणात नेत्यांचे कथित कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) लीक झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापले असून, या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांच्यात जोरदार वाद रंगला आहे.Andhare and Damania
या प्रकरणाची सुरुवात अंजली दमानिया यांनी काही नेत्यांचे सीडीआर सार्वजनिक केल्याने झाली. मात्र, इतकी संवेदनशील आणि गोपनीय माहिती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली, यावरून त्यांच्यावर टीका होऊ लागली. याच मुद्द्यावर सुषमा अंधारे यांनी दमानियांना लक्ष्य करत अनेक प्रश्न उपस्थित केले.Andhare and Damania
अंधारे यांनी विचारले की, सीडीआर नेमके कुणी दिले? कोणत्या अॅपद्वारे हे कॉल डिटेल्स मिळवले? आणि केवळ काही विशिष्ट नेत्यांचेच सीडीआर का समोर आले? त्यांनी या प्रकरणातील निवडक माहिती उघड करण्यामागील हेतूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या आरोपांना उत्तर देताना अंजली दमानिया यांनी व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की, त्यांना सीडीआर पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख नाही. त्यांनी “क्लॉड” नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही माहिती मिळाल्याचा दावा केला. तसेच, त्या सर्व विषयांवर बोलत नाहीत, पण ज्या विषयावर भूमिका घेतात, त्यावर पूर्ण ताकदीने लढतात, असेही त्यांनी सांगितले.
दमानिया यांनी या प्रकरणात गंभीर मुद्दे उपस्थित करत काही नेत्यांच्या कॉल्सची चौकशी करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्र्यांचे १७ कॉल, रुपाली चाकणकर यांचे १७७ कॉल, तसेच इतर नेत्यांमधील संपर्क याबाबत चौकशी व्हावी, असे त्यांनी नमूद केले. या संदर्भात त्यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट मागितल्याचेही सांगितले.
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी दमानियांच्या स्पष्टीकरणावर समाधान न व्यक्त करता पुन्हा सवाल उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, मूळ प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत, विशेषतः सीडीआरचा स्रोत आणि तो मिळवण्याची पद्धत स्पष्ट झालेली नाही. तसेच, या प्रकरणात संबंधित सर्वांची निष्पक्ष चौकशी व्हावी.
या वादामुळे सीडीआर लीक प्रकरण अधिकच गाजत असून, आता या प्रकरणात अधिकृत चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
CDR Row Escalates, Andhare and Damania Clash
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर