विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना औरंगजेब म्हणत उध्दव ठाकरेंनी टीका केली होती. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरेंना बिनडोक मानसिकतेतून बाहेर निघा असा सल्ला दिला आहे
बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी आहेत. जनमानसात प्रतिमा मलीन झाल्यावरही, जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही दुरुस्त होत नाहीत. 13 खासदार आणि 50 आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही. त्यांच नेतृत्व कोणीच मान्य करायला तयार नाही. म्हणून खासदार आमदार सोडून गेले, खासदार आमदारांचे त्यांचा कुठलाही संपर्क नव्हता म्हणून त्यांचे लोक एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले..
त्यांचे लोक सोडून गेल्यावर भाजपला दोष देण्यात,अमित शाह यांच्यावर टीका करतात, त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे आपण कुठे चुकलो आहोत याचा विचार उध्दव ठाकरेंनी केला पाहिजे असा टोला मारत बावनकुळे म्हणाले, 2019 मध्ये ते भाजप सोबत निवडून आले. भाजपसोबत उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली, तेव्हा जर त्यांनी भाजपशी गद्दारी केली नसती तर या महाराष्ट्राच वेगळं चित्र असतं . आपला दोष दुसऱ्या देणं मिडियाचा वेळ घेणे आणि भाषण करणे चुकीचं आहे
उद्धव ठाकरे निराश आहेत. असं बोलणं वेडेपणाचे लक्षण आहे,
बिनडोकपणा आहे, अजूनही सुधारत नाहीये. मला वाटतं अमित शाहांवर टीका करून किंवा आमचे पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाही. जी परिस्थिती त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल. आमचं जनमत अजून वाढेल उद्धव ठाकरे यांचा जनमत रोज कमी होईल. महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याला कंटाळली आहे. उद्धव ठाकरे यांनी बिनडोक मानसिकतेतून बाहेर निघाव आणि चार गोष्टी चांगल्या कराव्या.
आदित्य ठाकरे यांनी दावोस दौऱ्यावर केलेल्या टीकेवर बावनकुळे म्हणाले, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स आहे. त्या ठिकाणी सर्वच बिझनेसमन येतात. मग देशातील करार राहो राहो की विदेशातील. त्यामुळे आदित्य ठाकरे बालिश आहेत. त्यांना अजून सरकार पूर्ण कळलं नाही. दोन वर्ष पर्यटन मंत्री होते. ते पर्यटन करत राहिले. सरकारमध्ये मूळ गाभा त्यांना कळला नाही 17.75 लाख कोटींची गुंतवणूक आणली आहे, मात्र हे सुधारत नाही आहेत.
Chandrasekhar Bawankule’s advice to Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा कालच्या भाषणात रोख कोणाकडे होता? षडयंत्र कोणी रचले? छगन भुजबळ यांचा सवाल
- Donald Trump ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष; प्रत्येक धोक्यापासून अमेरिकन संविधानाचे रक्षण करण्याची घेतली शपथ
- Rahul Shewale : दुसऱ्या पक्षाच्या उदयापेक्षा स्वत:च्या पक्षाच्या अस्ताची चिंता करा, राहुल शेवाळे यांचा टोला
- कसला उदय होणार? तथ्यहीन बातम्या, अजित पवार यांनी फटकारले