विशेष प्रतिनिधी
पुणे : अजित पवारांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाले होते. खरातचा व्हीएसआर कंपनीच्या विमानातून झालेला प्रवास व त्याचे अनुयायी पाहता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का? हा संशय अधिक गडद होतो. अजितदादांच्या घातपातासंदर्भात चौकशी करताना सीआयडीने खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांचा देखील तपास करायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली.
अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले होते. तत्पूर्वी, त्यांच्या घराबाहेर कथितपणे काळी जादू झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. आमदार रोहित पवार या प्रकरणी वारंवार संशय व्यक्त करत काही सत्ताधारी नेत्यांवर संशय व्यक्त करत आहेत. या प्रकरणी महाराष्ट्रात एफआयआर दाखल करण्यात अपयश आल्यानंतर त्यांनी थेट कर्नाटकात जाऊन एफआयआर दाखल केला. या पार्श्वभूमीवर त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका विधानाचा दाखला देत उपरोक्त आरोप केला आहे.
रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ‘समता पतसंस्थे’त भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती, भोंदू खरातचा VSR कंपनीच्या विमांनामधून अनेकदा झालेला प्रवास आणि त्याचे अनुयायी हे सगळं बघता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का? यासंदर्भातील संशय अधिक गडद होत आहे.
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत भोंदू अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित महत्त्वाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, समता नावाची एक पतसंस्था आहे. त्यात पैसे टाकले किंवा काढले की एसएमएस येतो. मी या संस्थेची पूर्ण माहिती काढली आहे. त्यात मला अनेक गोष्टी समजल्या. 27 जानेवारी रोजी म्हणजे अजित पवारांच्या निधनाच्या एक दिवस आधी, खरातच्या समता पतसंस्थेच्या खात्याचे 17 मेसेज आले होते. तद्नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवशी (28 जानेवारी) 19 मेसेज आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 29 जानेवारी 10, 30 जानेवारी 8, तर 31 जानेवारी रोजी 8 मेसेज आलेत. या व्यवहाराची मी एसआयटीकडे चौकशी करण्याची मागणी करणार आहे.
Check the transactions and transactions of Ajitdada during his accident: Rohit Pawar’s demand
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर