विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chetan Tupe उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी चर्चेदरम्यान भावना अनावर होत डोळ्यात अश्रू आणत सरकारला कठोर सवाल केले. “२८ जानेवारी २०२६ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस होता. दोन महिने उलटूनही अपघाताचे सत्य समोर का येत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.Chetan Tupe
तुपे यांनी तपासातील विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या मनातील प्रश्नांना उत्तर मिळणे गरजेचे आहे,” असे सांगितले. त्यांनी अपघाताच्या कारणांवर सविस्तर प्रश्न उपस्थित करत, कमी दृष्यमानता असताना विमान लँडिंग करण्याचा निर्णय का घेतला गेला, विमान दुसऱ्या विमानतळाकडे वळवले का नाही, किंवा काही वेळ थांबवण्याचा पर्याय का वापरला गेला नाही, याबाबत स्पष्टीकरण मागितले.Chetan Tupe
तसेच, व्हीएसआर कंपनीकडून पायलटवर कोणताही दबाव होता का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. विमानात आवश्यकतेपेक्षा अधिक इंधन भरले होते का, असेल तर विमान डायव्हर्ट का केले गेले नाही, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.Chetan Tupe
उड्डाणापूर्वी विमानाची सुरक्षा तपासणी योग्य पद्धतीने झाली होती का, ती कोणी केली, संबंधित मेंटेनन्स इंजिनिअर कोण होता, याची माहिती अद्याप सार्वजनिक का करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी विचारले. “विमान उड्डाणासाठी पात्र ठरवणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे का लपवली जात आहेत?” असा सवाल त्यांनी केला.
तुपे यांनी पायलट बदलण्याच्या निर्णयावरही संशय व्यक्त केला. “सकाळी सहा वाजता ट्रॅफिक जॅममुळे पायलट बदलला, हे कारण संशयास्पद आहे. एवढ्या महत्त्वाच्या उड्डाणासाठी शेवटच्या क्षणी क्रू का बदलण्यात आला?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अपघातावेळी झालेल्या स्फोटांबाबतही त्यांनी गंभीर मुद्दा उपस्थित केला. “विमानात इंधनाशिवाय इतर कोणता माल होता का? त्यामुळेच स्फोट झाले का?” याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच डीएफडीआर आणि सीव्हीआर (ब्लॅक बॉक्स) अहवालाची अद्ययावत माहिती सार्वजनिक करण्याचीही त्यांनी मागणी केली.
तसेच व्हीएसआर कंपनीच्या इतर विमानांची तपासणी का करण्यात आली नाही, मेंटेनन्समध्ये हलगर्जीपणा झाला होता का, यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “इतक्या मोठ्या व्यक्ती या कंपनीच्या विमानातून प्रवास करतात, तरीही नियमांकडे दुर्लक्ष का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जोपर्यंत या अपघाताचे संपूर्ण सत्य समोर येत नाही आणि दादांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा तुपे यांनी दिला.
Chetan Tupe Breaks Down in Assembly Over Ajit Pawar Crash, Demands Thorough Probe
महत्वाच्या बातम्या