विशेष प्रतिनिधी
मुंबई: प्रशासनाला शिस्तीचे धडे मिळावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांसाठी 7 कलमी कृती आराखडा दिला होता. त्याचा निकाल जाहीर केला असून आदिती तटकरे यांचा महिला आणि बालविकास विभाग 80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकावर आहे. या प्रगती पुस्तकात सामान्य प्रशासन ( २४ टक्के), अन्न व नागरी पुरवठा (३३ टक्के) व नगर विकास विभाग (३४ टक्के) गुण मिळवित नापास झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महायुती सरकारचे प्रगती पुस्तक ट्वीट करत सर्वसामान्य जनतेसमोर मांडले आहे. यात त्यांनी कोणते विभाग अव्वल स्थानावर, कोणाची किती टक्के कामे पूर्ण झाली आहेत, याबद्दलची माहिती सांगितली आहे. या यादीत एकूण राज्यातील ४८ विभागांच्या प्रगतीचा आढावा देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सार्वजनिक बांधकाम विकास दुसऱ्या क्रमांकावर असला तरी त्यांच्याकडे असलेला नगरविकास विभाग मात्र ३४ टक्केच गुण मिळवित नापास झाला आहे. कृषी मंत्री माणिकराव काेकाटे यांचा कृषी विभाग ६६. १५ टक्के गुण मिळवित तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या सर्व ४८ विभागांना १०० दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम आखून दिला होता. त्यात महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय आणि लोकाभिमुख उपक्रमांची आणखी सुरू केली. त्यामुळे या ४८ विभागांचा रिपोर्ट कार्ड जारी करण्यात आले आहे. गेल्या १०० दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या ९०२ धोरणात्मक उद्दिष्टांपैकी ७०६ उद्दिष्टे (७८%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित १९६ उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील. एकूण ४८ विभागांपैकी १२ विभागांनी आपली १००% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी १८ विभागांनी ८०% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी
Chief Minister devendra fadnavis announced the result of hundred days program
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती