विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister Fadnavis छत्रपती संभाजीनगरमधील विद्यादीप नावाच्या बालगृहात घडलेल्या धक्कादायक प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दाखल घेतली आहे. जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याच्या निलंबनाची घोषणा केली असून, संस्थेची मान्यता देखील रद्द करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.Chief Minister Fadnavis
या बालगृहात अल्पवयीन मुलींच्या जबरदस्तीने धर्मांतरणाचा प्रयत्न झाल्याचा आरोप विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या संस्थेचा परवाना कालबाह्य झाला असूनही ९० पेक्षा अधिक अल्पवयीन मुलींना त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, या मुलींच्या खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले होते, ज्यामुळे त्यांची गोपनीयता धोक्यात आली. त्याचप्रमाणे, संबंधित जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याविरोधात याआधीही तब्बल १० तक्रारी दाखल झाल्या होत्या, पण त्यांनी सर्वच वेळेस दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी दानवे यांनी केली.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “ही घटना अत्यंत गंभीर असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात येत असून, संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल. केवळ बालगृहच नव्हे, तर अशा स्वरूपाच्या सर्व संस्थांची चौकशी करून दोषींना गय न करता निलंबित केले जाईल. या प्रकरणात पोलिसांनीही तपस सुरु केला असून वसतिगृह संचालक, अधीक्षक यांच्यासह अन्य जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतः मुलींशी संवाद साधत त्यांच्या जबाब नोंदवले.
राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग या दोघांनीही प्रकरणाची दखल घेतली आहे. मात्र, हे प्रकरण उघडकीस येण्याआधी राज्य महिला आयोगाने कोणतीही ठोस कारवाई का केली नाही, असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. त्यांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Chief Minister Fadnavis takes strict action in Chhatrapati Sambhajinagar Children’s Home case; District Child Development Officer suspended, institution’s recognition will be cancelled
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी