विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता लागलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल मंगळवारी, १४ मे २०२५ रोजी जाहीर होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. निकाल दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होणार आहे.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे :
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.result.mh-ssc.ac.in
www.maharashtraeducation.com
विद्यार्थी आपला बैठक क्रमांक (Seat Number) आणि आईचे नाव (Mother’s Name) टाकून निकाल पाहू शकतील. या निकालानंतर विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रक (mark sheet) संबंधित शाळेमार्फत काही दिवसांनंतर वितरित केले जाईल.
यावर्षी जवळपास १६.५ लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२५ दरम्यान राज्यभरात शांततेत पार पडली.
Class 10th results available online tomorrow at 1 pm
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित