CM Devendra Fadnavis : पाकिस्तानचे प्राॅक्झी वाॅर राेखण्यासाठी उपाययाेजना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लष्करी अधिकाऱ्यांसाेबत बैठक

CM Devendra Fadnavis : पाकिस्तानचे प्राॅक्झी वाॅर राेखण्यासाठी उपाययाेजना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लष्करी अधिकाऱ्यांसाेबत बैठक

devendra fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पाकिस्तानच्या प्राॅक्झी वाॅरला राेखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांसाेबत समन्वय बैठक घेतली. नागरी सुरक्षेसाठी या बैठकीत चर्चा झाली. पाकिस्तानने पाठीवर वार केला तर कसा राेखायचा यासाठी उपाययाेजनांवरही चर्चा झाली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक घेतली. या बैठकीत नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह सर्व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना या बैठकीत मुंबईतसह महाराष्ट्राच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, भारतीय सैन्याने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आहे. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि त्यांचे लष्करी तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानला माहित आहे की, ते भारताविरुद्ध युद्ध लढू शकत नाहीत. त्यामुळे पाठीवर वार करतात. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे कोणती खबरदारी घ्यावी आणि समन्वय कसा प्रस्थापित करायचा यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. आम्हाला कुठे जास्त लक्ष द्यायचे आहे हे आम्हाला समजले. आम्ही भविष्यात त्यानुसार काम करू.

फडणवीस म्हणाले की, ‘राज्याच्या नागरी सुरक्षेबाबत आज एक बैठक झाली. युद्धसदृश परिस्थितीमुळे सरकारने याआधीच आपल्या विविध विभागांची बैठक बोलावली होती. पण त्यावेळी लष्कराचे अधिकारी देश सुरक्षित ठेवण्यात व्यग्र होते. त्यामुळे त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. पण आमचा त्यांच्याशी चांगला समन्वय होता. आजच्या बैठकीत गेल्या काही दिवसांच्या अनुभवावरून आपल्याला आणखी काय करण्याची आवश्यकता आहे? भविष्यात आपला रोडमॅप काय असावा? आपण सतर्क कसे राहावे? यावर चर्चा झाली. सैन्याकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या आणि आम्ही देखील काही गोष्टींबाबत चिंता व्यक्त केल्या.’

CM Devendra Fadnavis meets military officers to discuss measures to stop Pakistan’s proxy war

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023