Congress-Shiv Sena : कॉंग्रेस – शिवसेना ठाकरे गटात जुंपली, राहूल गांधींना काळे फासण्याचा ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा

Congress-Shiv Sena : कॉंग्रेस – शिवसेना ठाकरे गटात जुंपली, राहूल गांधींना काळे फासण्याचा ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा

Congress-Shiv Sena

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Congress-Shiv Sena राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते. महाविकास आघाडी गेली खड्ड्यात पण राहुल गांधी जर नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळे फसू. ते करता नाही आले तर आम्ही त्यांच्यावर दगडफेक करू, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने दिला आहे. यावरून आता महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत.Congress-Shiv Sena

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात वादग्रस्त विधाने केली आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे यांनी त्यांना काळे फासण्याची धमकी दिली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बाळा दराडे यांच्या विधानाचा निषेध केला. अशा धमक्या आम्ही सहन करणार नाही. तुम्ही जर धमकीची भाषा करणार असाल तर आमचे कार्यकर्त्येच त्याला उत्तर देतील. अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही.” असे प्रत्युत्तर दिले.

राहुल गांधी किंवा कॉंग्रेसच्या कोणत्याही नेत्याने स्वातंत्र्यवीर सावकार यांच्याबद्दल बोलताना शिवीगाळ केलेला नाही. जे काय ऐतिहासिक संदर्भ किंवा दाखले आहेत ते सर्वांसमोर मांडले आहेत. या संदर्भात वैचारिक चर्चा होणे अपेक्षित आहे. जर या संदर्भात कोणी शेलक्या भाषेत बोलत असेल तर दुर्दैव आहे.” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली.

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आता महानगरपालिकांच्या निवडणुका असल्याने सदरील राजकारण केले जात आहे.” अशी टीका काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे. “पण राहुल गांधी यांना अशा शब्दात बोलणे कोणीही खपवून घेणार नाही. राहुल गांधी यांना तुम्ही हात लावून दाखवा,” असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर शिवसेना उबाठाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, एखाद्या पदाधिकाऱ्याने मांडलेलं मत ही पक्षाची भूमिका होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.

Congress-Shiv Sena joins Thackeray group, leader of Thackeray group warns of stone pelting Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023