विशेष प्रतिनिधी
मुंबई : Kailash Gorantyal मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून जालना येथील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी गुरुवारी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.Kailash Gorantyal
यावेळी ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खा. अशोक चव्हाण, आ. बबनराव लोणीकर, जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. नारायण कुचे, प्रदेश सरचिटणीस आ. संजय केनेकर, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.Kailash Gorantyal
यावेळी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांबरोबरच माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनीही मोठ्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश केला. यामध्ये माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, युवा नेता अक्षय गोरंट्याल, माजी नगरसेवक महावीर ढक्का, शिक्षादेवी ढक्का, जगदीश भारतीया, विजय चौधरी, विनोद रत्नपारखे, संगीता पाजगे, आनंद वाघमारे, ग्रामीणचे सरपंच गोविंद पवार, सुनील चिरखे, सरपंच मनोहर सूळसुळे, अंबादास लोंढे, तालुका उपाध्यक्ष संतोष देव्हडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर मोरे, बाळूकाका सिरसाट, किशोर कावले, पंचायत समिती माजी सदस्य समाधान शेजुळ यांचा समावेश आहे. तसेच शरद पवार गट आणि उबाठा गटातील कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
रविंद्र चव्हाण म्हणाले की, “जमिनीवरचा कार्यकर्ता असलेले कैलास गोरंट्याल हे भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचा आनंद आहे. या भागातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी महायुती सरकार आणि आमची आहे. भाजपाचे विकासाचे राजकारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ‘विकसित भारत’ आणि ‘विकसित महाराष्ट्रा’चा संकल्प पूर्ण करण्यासाठी गोरंट्याल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांचा विश्वास सार्थ ठरेल आणि भाजपा या सर्वांना पाठबळ देईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
“भाजपामध्ये प्रवेश करताना कोणतीही अपेक्षा ठेवली नसून केंद्र आणि राज्यातील निर्णायक नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे कैलास गोरंट्याल यांनी स्पष्ट केले. जालन्याच्या पहिल्या महापालिका निवडणुकीत पहिला महापौर भाजपचा होणार याची ग्वाही देतो, पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडेन,” असेही त्यांनी सांगितले.
Congress suffers a big setback in Marathwada, former MLA Kailash Gorantyal joins BJP
- महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान