विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister शपथा देऊनही तुम्हाला लाज वाटत नाही. मंत्र्यांची वादग्रस्त विधाने आणि कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिला.Chief Minister
वादग्रस्त मंत्र्यांना शेवटची संधी देऊन त्यांना तूर्त अभय दिले असले तरी आपले सरकार चांगले काम करत असून विरोधकांच्या हातात आयते कोलीत देऊ नका. तुम्हाला ही अखेरची संधी आहे. अन्यथा जी कारवाई करायची ती करूच असेही मुख्यमंत्री म्हणाले.Chief Minister
राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज झाली. पावसाळी अधिवेशनात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तसेच गृह राज्यमंत्री योगेश कदम वादग्रस्त ठरले. चित्रफितींमुळे बदनाम झालेल्या शिरसाट आणि कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाने लावून धरली होती. त्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. राज्य मंत्रिमंडळाच्या अजेंड्यावरील विषय संपल्यानंतर मुख्य सचिवांसह सर्व अधिकाऱ्यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आले.
सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्र्यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांनी सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपली वर्तणूक चांगली ठेवावी. राज्य सरकार चांगले काम करत असून मंत्र्यांच्या विधानाने त्यावर पाणी फेरता कामा नये, याची स्पष्ट जाणीव शिंदे आणि पवार यांनी करून दिली. त्यानंतर फडणवीस यांनी सरकारला अडचणीत आणणाऱ्या मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या.
मंत्र्यांच्या उलटसुलट विधानांचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर होतो. त्यामुळे मंत्र्यांनी बोलताना सतर्कता बाळगावी. जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटेल, अशी विधाने टाळावीत. यापुढे जर सरकारला अडचण निर्माण होईल अशी कृती मंत्र्यांकडून झाली तर मला विचार करावा लागेल. यापूर्वी आपण सगळ्यांनीच शपथ घेतली आहे. शपथ घेऊनही तुम्हाला लाज कशी वाटत नाही, अशा शब्दात फडणवीस यांनी आपला संताप व्यक्त केला.
विधिमंडळ अधिवेशनात भर सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाची चित्रफीत समाज माध्यमात व्हायरल झाल्याने अडचणीत सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अजित पवार यांनी कडक शब्दात समज दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी कोकाटे यांनी अजित पवार यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली आणि आपली बाजू मांडली. या दोघांची अँटीचेंबरमध्ये चर्चा झाली. यावेळी कोकाटे यांनी आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले. तसेच भविष्यात अशी चूक होणार नसल्याची हमी कोकाटे यांनी अजित पवार यांना दिली. कोकाटे यांनी चूक मान्य केल्यानंतर अजित पवार यांनी त्यांना माफ केले. त्याचवेळी यापुढे तुमची कुठलीही चूक पाठीशी घातली जाणार नसल्याचे अजित पवार यांनी कोकाटे यांना बजावले.