Aditya Thackeray : एमएमआरडीएच्या १४ हजार कोटींच्या निविदा घोटाळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार, राजीनामा घेण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी

Aditya Thackeray : एमएमआरडीएच्या १४ हजार कोटींच्या निविदा घोटाळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार, राजीनामा घेण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी

aditya thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : एमएमआरडीएच्या ठाणे-घोडबंदर ते भाईंदर बोगदा व उन्नत मार्ग या प्रकल्पातील १४ हजार कोटींच्या निविदा घोटाळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. त्यांचा राजीनामा घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “ही निविदा प्रक्रिया म्हणजेच ‘चंदा दो, धंदा लो’ या कार्यपद्धतीचं जिवंत उदाहरण आहे. सुप्रीम कोर्टाने या निविदा रद्द करण्याचे आदेश दिले आणि सरकारच्या कारभारावर शिक्कामोर्तब केला. हा निर्णय म्हणजे महायुती सरकारच्या गोंधळलेल्या कारभाराला बसलेली चपराक आहे. ”

निवडणूक काळात भाजपला तब्बल 600 कोटी रुपयांचे ‘दान’ देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंग कंपनीला ठेका मिळावा म्हणून नियोजनबद्ध खेळी करण्यात आली होती, असा आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले, “हे पैसे घेऊन त्यांच्यासाठी टेंडरचे नियम बदलले गेले. कोर्टात सरकारचा मुखवटा उतरला गेला आहे.

या घोटाळ्याविरोधात न्यायालयात लढा देणाऱ्या एल अँड टी कंपनीचं तसेच सर्वोच्च न्यायालयाचंही त्यांनी अभिनंदन केलं. “गेल्या वर्षी याच प्रकल्पात घोटाळा होत असल्याचं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. फक्त 20 दिवसांची मुदत देऊन टेंडर काढणं हीच पुरेशी शंका निर्माण करणारी बाब होती. एमएमआरडीएने कोर्टात गेल्यावरच ती मुदत 60 दिवसांपर्यंत वाढवली, म्हणजे घोळ होता हे स्पष्टच झालं,” असं ठाकरे यांनी सांगितलं.

“या देशात अखेर ‘सत्तामेव जयते’ नव्हे, ‘सत्यमेव जयते’ असाच विजय होतो, हे कोर्टाच्या निर्णयाने सिद्ध झालं.मुख्यमंत्री असताना शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते होते आणि एमएमआरडीए हाच खात्याचा भाग आहे. केवळ अधिकाऱ्यांवर कारवाई करून शिंदे यांची जबाबदारी झटकता येणार नाही. निविदेच्या अटी शिथिल करून आपल्या ‘लाडक्या ठेकेदारांना’ फायदा करून देण्याचे आदेश याच वरिष्ठ पातळीवरून दिले गेले होते,” असा दावा त्यांनी केला.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करत विचारलं, “जे स्वतःला स्वच्छ कारभाराचा पुरस्कर्ता म्हणवतात, ते एकनाथ शिंदे यांच्यावर ईडी, ईओडब्ल्यू, इन्कम टॅक्स आणि न्यायालयीन चौकशीचे आदेश देतील का? आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढतील का?”

Deputy Chief Minister Eknath Shinde is responsible for the Rs 14,000 crore MMRDA tender scam, Aditya Thackeray demands his resignation

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023