विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदान अचानक वाढल्याचा जुनाच दावा नव्याने केला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर चांगलेच बरसले आहेत. महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.Devendra Fadnavis
राहुल गांधी लोकसभेत बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमधील पाच महिन्यांत मतदारांची संख्या सुमारे ७० लाखांनी वाढली. फेरफार झाल्याचा आरोप करत त्यांनी यासंबंधी आकडेवारी विश्लेषणासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. राहुल गांधी म्हणाले की ते आरोप करत नाही. मात्र आयोगाने यावर उत्तर दिले पाहिजे.
Introspect instead of insulting Maharashtra !
You have insulted the people of Maharashtra, the land of Chhatrapati Shivaji Maharaj, BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar, Mahatma Phule and Veer Savarkar.
You have questioned the democratic mandate given by the people of Maharashtra…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 3, 2025
गांधी यांच्या वक्तव्यानंतर भाजपाकडून त्यांच्यावर महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा! तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, वीर सावरकर यांच्या भूमीचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे.
तुमच्या पक्षाचा पराभव झाल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील जनतेने एनडीएला लोकशाहीच्या मार्गाने दिलेल्या जनादेशावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
राहुल गांधी यांच्या या आरोपांना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीदेखील तीव्र आक्षेप घेतला. देशाच्या संवेदनशील मुद्द्यांविषयी राहुल गांधी यांनी आता तरी जबाबदारीने बोलावे, असा सल्ला रिजिजू यांनी यावेळी दिला.
Devendra Fadnavis lashes out at Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- Mahakumbh महाकुंभातील चेंगराचेंगरी हे एक षड्यंत्र! भाजप खासदार रविशंकर यांचा संसदेत दावा
- गोदातटीच्या माहेरवाशीणीचा गौरव; राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकरांचा नाशिक मध्ये गुरुवारी भव्य सन्मान सोहळा!!
- Mohit Kamboj : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात खोडसाळपणे भाजप नेते मोहित कंबोज यांचे नाव