Dhananjay Munde : धनंजय मुंडे म्हणाले, परळीच्या मातीसाठी प्राणही द्यावे लागले तरी मी मागे हटणार नाही

Dhananjay Munde : धनंजय मुंडे म्हणाले, परळीच्या मातीसाठी प्राणही द्यावे लागले तरी मी मागे हटणार नाही

Dhananjay Munde

विशेष प्रतिनिधी

परळी:  Dhananjay Mundeमागील काही महिन्यांपासून परळीवर झालेल्या टीका, आरोप आणि वादांचा उल्लेख करून त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन करत येथील मातीसाठी प्राणही द्यावे लागले तरी मी मागे हटणार नाही, असा विश्वास माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.Dhananjay Munde

परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते . या मेळाव्यास पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.Dhananjay Munde

धनंजय मुंडे विरोधकांवर टीका करताना म्हटले, परळीला गेल्या वर्षभरात अनावश्यक बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. परळीकरांनी त्याला ठाम उत्तर द्यायचे आहे. मी प्रत्येक निवडणूक मनापासून लढवली आहे.Dhananjay Munde



दहा महिन्यांपासून जगमित्र कार्यालय सुरू आहे, पण आज तिथे एकही माणूस नाही, असे वक्तव्य करत त्यांनी नाव न घेता काही व्यक्तींवर अप्रत्यक्ष टोला लगावला. या विधानानंतर वाल्मिक कराड प्रकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली.

धनंजय मुंडेंनी बोलताना महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाची जबाबदारी स्वतःवर आणि पंकजा मुंडे यांच्यावर असल्याचे सांगितले. त्यांनी परळीत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा देत, पुढील वर्षभरात आणखी मोठे प्रकल्प प्रत्यक्षात दिसतील, असा विश्वास व्यक्त केला.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, महायुतीच्या उमेदवारांना अ‍ॅडव्हान्समध्ये शुभेच्छा देते. परळी यावेळी इतिहास घडवणार आहे. आम्ही आमचे वैयक्तिक भावभावना आणि इगो बाजूला ठेवले आहेत. आता एकच ध्येय, परळीचा विकास,.

पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखाना सुरू झाल्याची माहिती देत, आगामी काळात रोजगारनिर्मिती वाढेल, असा विश्वासही व्यक्त केला. आपण एकत्र आलो तर परळीचा विकास निश्चित आहे. भांडणे, वाद संपवून विकासाच्या दिशेने पाऊल उचलण्याची ही वेळ आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले.

Dhananjay Munde said, I will not back down even if I have to give my life for the soil of Parli.

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023