विशेष प्रतिनिधी
शिर्डी : अनेक प्रसंगी अजितदादांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही शिंगावर घेतले. २०१९ साली पहाटेची शपथ घेऊ नका हे मी सांगितले होते. ती शपथ दादांनी घेतली. पण शिक्षा मात्र मला मिळाली, अशी खंत व्यक्त करत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. Dhananjay Munde
लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीत प्रचाराला गेल्याने आपल्याला टार्गेट केले जात असल्याचे सांगताना मुंडे म्हणाले, अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी गेलो होतो. त्यावेळी बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी जाऊ नकोस अन्यथा पुढे विधानसभेत त्याचा तुला त्रास होईल, असा सल्ला मला अनेकांनी दिला होता. मात्र तरीही मी गेलो. माझ्यासह अनेकांना विधानसभा निवडणुकीत ठरवून टार्गेट केले गेले. मी माझ्या परळीच्या जनतेच्या आशीर्वादाने एक लाख चाळीस हजार मतांच्या लिडने निवडून आलो, त्याचीच पोटदुखी अनेकांना प्रकर्षाने झाली. ठाण्यात मी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेलो म्हणून तिथले नेते बीडमध्ये येऊन मला टार्गेट करत आहे, हेही उघड झाले.
मला बदनाम करा पण बीड जिल्ह्याला बदनाम करु नका, धनंजय मुंडे यांची विनंती
विधानसभा निवडणुकीत मी केवळ ५ दिवस पूर्णवेळ परळीत होतो, उर्वरित वेळेत मी पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या, बैठका घेतल्या. त्यातील बहुतांश उमेदवार निवडून आले, असेही मुंडे पुढे बोलताना म्हणाले.
पक्षात आल्यापासून आजवरच्या वाटचालीत आमचे नेते म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहिलो. अनेक प्रसंगी अजितदादांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही शिंगावर घेतले. २०१४ – १९ या काळात विरोधी पक्षनेतेपदी काम केले. पक्षाच्या पडत्या काळात चार वेळा हल्लाबोल, परिवर्तन, शिवस्वराज्य यात्रांमध्ये सहभागी होऊन सबंध महाराष्ट्र पिंजून काढला. तत्कालीन सरकारला वाकवायचे काम केले.२०१९ साली पहाटेची शपथ घेऊ नका हे मी सांगितले होते. ती शपथ त्यांनी घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली, अशी खंतही धनंजय मुंडे यांनी आज प्रथमच बोलून दाखवली.
Early morning oath, campaigning in Baramati makes me a target, Dhananjay Munde targets Sharad Pawar
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde मला बदनाम करा पण बीड जिल्ह्याला बदनाम करु नका, धनंजय मुंडे यांची विनंती
- Dhananjay Munde धनंजय मुंडे आता तरी राजीनामा द्या, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे आवाहन
- Saif Ali Khan सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुख्य आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे उघड
- Ashwini Vaishnav भारतातील डिजिटल क्रांतीचा दावोस येथे जयघोष