विशेष प्रतिनिधी
सांगली: सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुनातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
सांगलीतील विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. उद्या या मागण्यासाठी सांगलीत आक्रोश मोर्चा रद्द काढण्यात येणार होता मात्र आक्रोश मोर्चा रद्द करून त्याऐवजी आज सांगलीत एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.
मस्साजोग तालुका केज बीड जिल्हा येथील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर व निघृण हत्या तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची झालेली हत्या या दोन्ही घटनेचा निषेध करण्यात आला.
सदरचा खटला हा फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा. तसेच धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ नये. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये सर्वच महत्त्वाच्या शासकीय पदावर एकाच वंजारी जातीचे अधिकारी कसे आले या याची चौकशी व्हावी. संतोष देशमुख यांची कन्या वैष्णवीस शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावे, तसेच देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीयांना शासनाकडून भरघोस आर्थिक मदत देण्यात यावी.
वाल्मीक कराडच्या देशातील, परदेशातील संपूर्ण संपत्तीची इन्कम टॅक्स व ईडी कडून चौकशी करण्यात यावी व या मध्ये जे कोण सूत्रधार असतील त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी. या गुन्ह्यामधील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करावी पण नार्को टेस्ट मध्ये ज्या ज्या संबंधितांची नावे निष्पन्न होतील त्या सर्वाच्या वर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलक
दिग्विजय पाटील यांनी केली आहे.
Dharne movement of Maratha community in Sangli
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार