विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नवीन तसेच मागील हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात आजपासून जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. या योजनेसाठी राज्य शासनाने ₹3600 कोटींच्या निधीला मंजुरी दिली असल्याचे ते म्हणाले Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी सुरु करण्यात आली असून, या योजनेत लाखो महिलांनी नोंदणी केली आहे. याअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा ठराविक रक्कम बँक खात्यात थेट जमा केली जाते.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू आहे.या अधिवेशनात सादर होणाऱ्या पुरवणी मागण्यांनाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.
दरम्यान, यंदा जून महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. मात्र काही भागांत अतीवृष्टीमुळे शेती व मालमत्तेचे नुकसान झाले असून, अशा ठिकाणी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
Distribution of installments of Mukhyamantri Ladki Bahin Yojana starts from today
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी