Ashish Shelar : गैरसमजाचे बळी पडू नका, आम्ही चर्चेला तयार, आशिष शेलार यांचा ठाकरे बंधूंना सल्ला

Ashish Shelar : गैरसमजाचे बळी पडू नका, आम्ही चर्चेला तयार, आशिष शेलार यांचा ठाकरे बंधूंना सल्ला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : गैरसमजाचे बळी पडू नका. आम्ही चर्चेला तयार आहोत, असा सल्ला राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिला आहे. . २०२२ ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्राचा स्वीकार करणाऱ्या कारवाईची सुरुवात ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच झाली होती असेही त्यांनी सांगितले.



हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकत्र आणि एकच मोर्चा निघणार आहे. याबाबत शेलार म्हणाले, मराठी माणसासमोर आमच्या भूमिका स्पष्ट आहेत. या राज्यात सक्ती कोणी आहे तर ती मराठीची आहे. भाजप मराठीसाठी कट्टर आहे. भाजप मराठीची आग्रही आहे. भाजप आणि केंद्र सरकार यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. शैक्षणिक व्यवस्थेत त्रिभाषा सूत्री हे विद्यार्थ्यांचे हित आहे. पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी आहे. ते दोघे किंवा इतर गैरसमजाचे बळी आहे. गैरसमजाचे बळी पडून आणि गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये, जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावे, ते म्हणजे मराठी अनिवार्य आहे. हिंदी भाषा सक्ती नाही. हिंदी भाषा ही ऐच्छिक आणि पर्यायी भाषा आहे. आम्ही मराठीचे समर्थक पण हिंदुस्थानी भाषांचे खुनी नाही.

लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यासोबतच कायद्यानुसार मोर्चा काढण्याचाही अधिकार आहे. अंतिमत: निर्णय पोलीस घेतील. असा सरकारचा किंवा भाजपचा विचार नाही. त्यात आयोगाचा एक रिपोर्ट हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आलेला आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितले.

राज्य सरकारने हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एल्गार पुकारला आहे. येत्या ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावर मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. राज ठाकरेंच्या घोषणेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले. त्यांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो शेअर करत, हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आणि एकच मोर्चा निघणार असल्याची घोषणा केली. यामुळे राजकीय वर्तुळात ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युतीच्या दिशेने सकारात्मक पावले पडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Don’t fall prey to misunderstandings, we are ready for discussion, Ashish Shelar’s advice to Thackeray brothers

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023