विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी खरेदी केल्याने वाद निर्माण झाला असताना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. ही जमीन पेशव्यांची होती असा दावा त्यांनी केला आहे. Eknath Khadse
खडसे म्हणाले, कोरेगाव पार्क परिसरातील जमीन ही बनावट कागदपत्रे तयार करत खरेदी केली होती. ही जमीन पेशव्यांची होती. विध्वंस-भट नावाच्या कुटुंबीयांना ही जमीन उदरनिर्वाहासाठी दिली होती. त्यामध्ये एक अट दिली होती की कुटुंबामध्ये मुलगा जोपर्यंत जन्माला येईल तो पर्यंत ही जमीन तुमची राहील. त्यांना मुलगी झाल्यावर तो अधिकार संपला. मग ही जमीन सरकार जमा झाली. 1883 साल पासून ही जमीन सरकारी जमीन झाली. 1920 साली ही जमीन कृषी महाविद्यालयांसाठी ही जमीन देण्यात आली. तेव्हापासून ही जमीन कृषी विभागाकडे आहे.
काही जमीन मोकळी आहे, काही जमीनीवर इंग्रजांच्या कालखंडात बांधकाम झाले आहे. ही जमीन अत्यंत महत्त्वाच्या अशा शिवाजीनगर परिसरात आहे. तिचे बाजारमूल्य हे 1500 कोटी रुपयांच्या आसपास आहे. विध्वंस कुटुंबातील लोकांना हाताशी धरत तेजवानी यांनी कागदपत्रे तयार केली. कृषी महाविद्यालयाकडे जमीन असताना 2009 पासून प्रकार सुरू झाला, असेही त्यांनी सांगितले.
एकनाथ खडसे म्हणाले की, यातील काही जागा पीएमटीसाठी राखीव दाखवण्यात आली. म्हणून ती पडून होती. मग यांनी ती जागा आमची आहे असे सांगत कलेक्टर कडे आमची जमीन परत द्यावी अशी मागणी केली पण त्यांनी ती नाकारली. हे लोकं मग आयुक्तांकडे गेले. त्यांनीही सरकारी जमीन असल्याचे सांगत जमीन देण्यास नकार दिला. त्या निर्णयाविरोधात ते मंत्र्यांकडे गेले, त्यांनी सरकारी जमीन आहे सांगत त्यांना जमीन देण्यास नकार दिला. मग ही लोक कोर्टात गेले. पुणे मनपा यानंतर त्यांना टीडीआरचा पैसा देण्यापर्यंत आली. तेव्हा माझ्या लक्षात हा विषय आणून देण्यात आला. मी प्रशासनाला पत्र लिहून ही जमीन सरकारी आहे. त्यासाठी टीडीआर मंजूर करू नये अशी मागणी केली होती. देवेंद्र फडणवीस आणि मी हा विषय विधान सभेत मांडला होता.
एकनाथ खडसे म्हणाले की, 2015 मध्ये ही जमीन त्यांनी मिळवली. 2015 मध्ये मी मंत्री असताना आपली सरकारी जमीन हडप करण्याचा प्रयत्न होत आहे म्हणून हेमंत गावंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यावेळी संशयित आरोपी म्हणून एकबोटे, वाघमारे, इधाटे, विध्वंस, हेमंत गावंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
Eknath Khadse reveals details about Koregaon Park land
महत्वाच्या बातम्या
- हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप
- Ambadas Danve : मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला…! अंबादास दानवे यांचा अजित पवारांवर निशाणा
- राजद म्हणजे खंडणी, घराणेशाही आणि घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
- स्लीपर वंदे भारत ट्रेन धावली ताशी १८० किमी वेगाने, डेस्कवरचे पाणीही नाही सांडले



















