विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde विराेधी पक्षावर तुटून पडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाद नसल्याचे सांगत त्यांनाच अडचणीत आणले आहे. आमचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत वाद नसून आमचे मनोमिलन आहे. आमचा पंडित नथुराम गोडसेंना मानणाऱ्या आनंद दिघेंचा आणि एकनाथ शिंदेंचा डीएनए एक असल्याचे वक्तव्य त्यांनी केल्यामुळे शिंदे गट अडचणीत सापडला आहे. Eknath Shinde
सदावर्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले हाेते. सदावर्ते त्यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले, “आमचा एकनाथ शिंदे यांच्याशी कोणताही वाद नाही. आमचे मनोमिलन आहे, पण माध्यमांनी चुकीच्या बातम्या दाखवल्या. एकनाथ शिंदेंचे आम्ही चाहते असून आमचा वाद नाही तर आमचं मनोमिलन आहे. पण माध्यमांनी चुकीच्या बातमी दाखवल्या. पंडित नथुराम गोडसे यांच्या विचारांसाठी आनंद दिघे कोर्टात लढले होते त्यामुळे आनंद दिघे, एकनाथ शिंदे आणि आमचा डीएनए एकच आहे. शिवाय हे फक्त मनोमिलन नाही तर आमचा वैचारीक डीएनए एकच आहे. Eknath Shinde
आनंद दिघे साहेबांनी हाय कोर्टात पीटीशन दाखल करत पंडित नथुराम गोडसेंचा विचार मारला जाऊ नये यासाठी लढा दिला होता. त्यामुळे जे दिघे साहेबांचे समर्थक आहेत त्यांच्यापासून आम्ही विभक्त होऊ शकत नाही. कारण दिघे गोडसेंना मानतात आणि दिघेंना एकनाथ शिंदे मानतात आम्ही एकनाथ शिंदे आणि नथुरामला मानतो त्यामुळे आम्ही एक आहोत, असेही सदावर्ते म्हणाले.
महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ‘पंडित’ कसं म्हणू शकता?” या प्रश्नावर सदावर्ते म्हणाले, “मी हत्येचे किंवा हिंसेचे समर्थन करत नाही. मात्र, पंडित नथुराम गोडसे यांच्या ‘अखंड हिंदू भारत’ या विचाराला पुन्हा एकदा समजून घेण्याची गरज आहे.”
Eknath Shinde in trouble after Sadavarte praises him, says “Shinde and Anand Dighe share the same DNA : both admirers of Nathuram Godse
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा