विशेष प्रतिनिधी
ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या सतत माध्यमांमध्ये येत असतात. यावर आता एकनाथ शिंदे यांनीच खुलासा केला आहे. गावी हेलिकॉप्टरने जाण्याचे कारण ह त्यांनी सांगितले आहे
. ठाण्यात कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले, मी गावी गेलो की मीडिया मधे बातमी येते एकनाथ शिंदे नाराज. पण मी १० तास प्रवास करून जाण्यापेक्षा हेलिकॉप्टरने जातो. तेवढ्या वेळात १० हजार सह्या करतो म्हणून २ पेन ठेवले आहे
आम्ही अडीच वर्षात रेकॉर्ड ब्रेक योजना राबविल्या असे सांगून एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेबांनी सांगितल ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण. हे मी पाळत आलो आहेत. एअर कंडीशन विश्रांती गृहाचे उद्घाटन केले. जिथे एसटी डेपो तिथे कॅशलेस दवाखाना केला आहे .म्हणालो एकजूट होऊया आणि कॅन्सर ल हरवू या. ७० कोटींचे नॅचरोपॅथी वेलनेस सेंटर सुरू करणार आहेत.
मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून ४५० कोटींची वाटप केले . अडीच वर्षात रेकॉर्ड ब्रेक योजना राबविल्या. महात्मा फुले आरोग्य योजना १.५ लाखाची होती आता ५ लाखाची झाली. कोणी जात नाही तिथे मी जातो . मी मंत्री आहे, बोलायला नको. पण फाईल तयार करत बसलो तर माझे मंत्री पद जाईल पण कामे होणार नाहीत. म्हणून गाड्या भरून घेऊन गेलो वाटायला. आम्ही वाढदिवसानिमित्त लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असतात त्यांना मोफत उपचार दिले. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. ह्या हाताने केलेलं ह्या हाताला कळत कामा नये अशी माझी पद्धत आहे.
Eknath Shinde said, if not because of displeasure, he goes to the village by helicopter!
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन