विशेष प्रतिनिधी
मुंबई: Scientist वेगवेगळी नावे धारण करून स्वतःला ‘इस्त्रो’चा शास्त्रज्ञ, डॉक्टर किंवा उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे भासवून अनेक महिलांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या 21 वर्षीय आदर्श म्हात्रे याला पोलिसांनी अटक केली आहे.Scientist
केवळ दहावी पास असलेल्या या आधुनिक लखोबा आदर्श म्हात्रे याने मॅट्रिमोनी साईट्सवर 12 वेगवेगळ्या नावांनी बनावट प्रोफाईल्स तयार केले होते.Scientist
- तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश देऊ शकतात, पण ते ब्रह्मवाक्य नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
तो कधी शास्त्रज्ञ, कधी डॉक्टर, तर कधी बँक अधिकारी असल्याचे सांगून महिलांचा विश्वास संपादन करायचा. तो खोट्या ओळखीची कागदपत्रेही वापरत असे. राहणीमान उच्च ठेवून आणि लग्नाचे आमिष दाखवून तो महिलांशी जवळीक साधायचा. एकदा विश्वास निर्माण झाला की, तो त्यांच्याशी शारीरिक लगट करून लैंगिक शोषण करत असे. अनेक महिलांकडून त्याने लग्नाचे कारण सांगून किंवा वैयक्तिक अडचणींचे कारण देऊन मोठी रक्कम उकळल्याचेही तपासात समोर आले आहे.
आदर्श म्हात्रे याच्या विरोधात नवी मुंबईसह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित महिलांच्या तक्रारींनुसार, हा तरुण अत्यंत सराईतपणे आपली ओळख बदलून महिलांची दिशाभूल करत असे. नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणातील धागेदोरे पुण्यातही आढळले आहेत. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी आरोपीचा ताबा घेतला असून अधिक तपास सुरू केला आहे.
Fake ‘Scientist’ Arrested for Exploiting Women Across Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर