Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री वाशीजवळ अपघात, तुपकरांसहित सर्वजण सुखरूप

Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला मध्यरात्री वाशीजवळ अपघात, तुपकरांसहित सर्वजण सुखरूप

ravikant tupkar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सध्या कर्जमुक्तीच्या मागणीवर राज्यभरात आक्रमक आंदोलन सुरू केलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या वाहनाला रविवारी (दि. १८ मे) रात्री १२.३० ते १ वाजण्याच्या दरम्यान वाशी तालुक्यातील पारगाव टोलनाक्यावर अपघात झाला. मद्यधुंद अवस्थेतील ट्रक ड्राइव्हरने भरधाव ट्रकची इनोव्हाला मागून धडक दिली. सुदैवाने यात कुणाला जीवितहानी व गंभीर दुखापत झाली नाही.गाडीतील दोघांना किरकोळ मार लागला आहे.

रविकांत तुपकर यांना लोकवर्गणीतून लोकांनी दिलेली ‘लोकरथ’ नामक इनोव्हा (क्रमांक MH 28 BQ 9999) पारगाव टोल नाक्यावर थांबलेली होती. यावेळी मागून भरधाव वेगात आलेल्या साखरेने भरलेल्या ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली. ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत होता. या धडकेचा आवाज इतका जबरदस्त होता की स्फोट झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.

गाडीतील मागील सीटवर बसलेले लोक अक्षरशः समोर फेकले गेले. या अपघातात सुदैवाने रविकांत तुपकर यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते पूर्णतः सुरक्षित आहेत. मात्र, गाडीत त्यांच्यासोबत असलेले पीए कार्तिक सवडतकर व राजाराम जाधव यांना सौम्य मार लागला आहे. चालक अजय मालगे व तुपकरांचे सहकारी गजानन नाईकवाडे यांना कोणतीही दुखापत नाही. ट्रक चालक हा दारूच्या नशेत होता, अपघातानंतर तो सारखे खोटे बोलत होता व माहिती लपवण्याचा प्रयत्न करत होता.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, परिस्थिती चे गांभीर्य ओळखून चालकासह ट्रकमधील किनर ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून साखरेने भरलेला ट्रकही जप्त करण्यात आला आहे. हा अपघात होता की, घातपाताचा प्रयत्न, याबाबत अनेक शंका उपस्थित होत असून पोलिसांकडून दोन्ही बाजूंनी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

रविकांत तुपकर हे राज्यात कर्जमुक्तीच्या प्रश्नावर दौऱ्यावर आहेत. नुकतेच त्यांनी नाशिक, परभणी, बीड येथील दौरे पूर्ण केले असून आज अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे ‘कर्जमुक्ती एल्गार सभेला संबोधित केले. सभा आटोपून त्यांनी लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथे कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजन घेतले . त्यानंतर रात्री ११ वाजता जालन्याच्या ते दिशेने मार्गस्थ झाले असताना वाशी जवळ हा अपघात घडला. या अपघातामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राज्यभर मोठी खळबळ उडाली होती.

मात्र तुपकर हे पूर्णतः सुरक्षित असल्याचे समजताच सर्व कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित यंत्रणांकडून सखोल व सर्व बाजुनी चौकशी व्हावी अशी मागणी क्रांतिकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. ट्रक चालक संभाजी डोंगरे (पंढरपूर )याच्यावर वाशी पोलीसमध्ये कलम 281,कलम 185 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Farmer leader Ravikant Tupkar vehicle met with an accident near Vashi at midnight, everyone including Tupkar is safe

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023