विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde सरकार कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार कर्जमाफीच्या मुद्यावर गंभीर असून योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.Eknath Shinde
राज्यात काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, सद्यस्थितीत शेतकरी संकटात आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ मदत देण्यास आमचे प्राधान्य आहे. या प्रकरणी युद्धपातळीवर पंचनामे करून दिवाळीपूर्वी त्यांना मदत पोहोचती होईल याची काळजी घेतली जाईल. राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्यावर अत्यंत गंभीर आहे. त्याचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल. तूर्त सरकार कोणत्याही परिस्थितीत आपल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याची ही वेळ आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे.Eknath Shinde
मुख्यमंत्री बुधवारी सोलापूरच्या व मी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. आमचे सर्व मंत्रीही आपापल्या जिल्ह्यांत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतील. ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे, तिथे मदत केली जाईल. अतिवृष्टीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असे शिंदे म्हणाले.Eknath Shinde
तमराठवाड्यात परिस्थिती गंभीर आहे. उत्तर महाराष्ट्र व विदर्भातही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली. मंत्री शंभूराज देसाई यांनी पश्चिम महाराष्ट्रातील स्थितीचा उल्लेख केला. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य स्थिती होती. ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतपिकांच्या नुकसानीसह जमीनही खरडून गेली आहे. ओढ्याच्या व नाल्याच्या शेजारी असलेल्या गावांतील संपूर्ण माती वाहून गेली आहे. त्यामुळे तिथेही मोठे नुकसान झाले आहे, असे शिंदे म्हणाले.
पावसामुळे झालेल्या नुकसानीवर आज मंत्रिमंडळात चर्चा झाली. सरकारने या प्रकरणी युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे. त्यांनाही सरकारच्यावतीने तत्काळ मदत दिली जाईल. काही ठिकाणी पाळीव प्राण्यांचीही हानी झाली आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. कॅबिनेटमध्ये सर्वच प्रकारच्या नुकसानीवर गांभीर्याने चर्चा झाली. शासन म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी कायम उभे आहोत. कारण शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. आमच्या मागच्या अडीच वर्षांच्या काळातही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत किंबहुना त्यांच्यासाठी योजना राबवण्याचे काम केले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला पंचनामे नंतर करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. पत्रकारांनी याविषयी एकनाथ शिंदे यांना छेडले असता ते म्हणाले, उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते. त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचे माझ्या ऐकीवात नाही. त्यामुळे सत्तेत असताना एक बोलायचे आणि विरोधी पक्षात असताना दुसरे बोलायचे अशी दुटप्पी भूमिका आम्ही कधी घेतली नाही. आम्ही घेणार नाही. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामुळेच आम्ही अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर पंचनामे करून युद्धपातळीवर लोकांना मदत करण्याचे निर्देश दिलेत.
Farmers will not be left to chance: Deputy Chief Minister Eknath Shinde assures
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















