विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी झेप्टोची मूळ कंपनी किराणाकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचा मुंबई, धारावीतील परवाना निलंबित केला आहे. धारावी येथील झेप्टोच्या गोदामावर महाराष्ट्र एफडीएने अचानक छापा टाकला. यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता तसेच गैरसोय आढळली. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. काही काळापासून झेप्टोच्या गोदामांबाबत अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळेच अन्न औषध प्रशासनाने अचानक तेथे छापा टाकत ही कारवाई केली आहे. Zepto warehouse in Dharavi
अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम आणि सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी राम बोडके यांनी ही कारवाई केली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, छापा घातलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुरवस्था आढळली. काही खाद्यपदार्थांना बुरशी लागली होती. तर खायच्या गोष्टी या साचलेल्या पाण्याजवळ ठेवल्या होत्या. कोल्ड स्टोरेजचे तापमान नियमांनुसार गेले नव्हते. परिसर अस्वच्छ असतानाही अन्न पदार्थ थेट जमिनीवर ठेवले होते. महत्त्वाचे म्हणजे, मुदत संपलेले अन्नपदार्थ वेगळे केलेले नव्हते. त्यामुळे, या गोदामाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकारी म्हणाले.
काही काळापासून या गोदामांची तपासणी करण्याची योजना आखत असल्याचे या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. या दरम्यान आम्हाला अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यालयासह स्थानिक मनसे कार्यकर्त्यांकडून काही सूचना प्राप्त झाल्या. या सूचनांच्या आधारावर आम्ही तपासणी केली असता अतिशय वाईट परिस्थिती आढळली. त्यामुळेच आम्ही तात्काळ परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. अन्न सुरक्षा नियमांचे पूर्णपणे पालन होईपर्यंत आणि परवाना प्राधिकरणाकडून मंजुरी मिळेपर्यंत परवाना निलंबित राहील
या प्रकरणी आम्ही अंतर्गत चौकशीला सुरुवात केली असून ग्राहकांना सुरक्षित गोष्टी देण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे झेप्टोने म्हटले आहे. खाद्यपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छतेचे निकष सांभाळणे ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळेच आम्ही या प्रकरणाच्या चौकशीस सुरुवात केली आहे. आमच्या चुका सुधारून ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे.
FDA cancels license after surprise raid on Zepto’s warehouse in Dharavi
महत्वाच्या बातम्या
- Kumar Vishwas पाकिस्तानला महिलांची ताकद दाखवून दिली, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सोहळ्यात कुमार विश्वास यांचे प्रतिपादन
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावच्या रिंगणात, बिनविरोध निवड होऊ देणार असल्याचा विरोधकांचा इशारा
- Narendra Modi : गोळीला आता गोळ्याने उत्तर मिळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
- Sanjay Raut : जे भाजपाला ‘चंदा’ देतील त्यांचा धंदा जोरात, संजय राऊत यांची टीका