विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाषण करताना बाेलण्याच्या भरात केलेल्या वक्तव्यामुळे वनमंत्री गणेश नाईक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांनी स्वत:च बिबट्याची पिल्ले व हरणाचे पिल्लू पाळले होते, अशी कबुली दिल्याने विराेधी पक्ष व पर्यावरण कार्यकर्त्यांकडून प्रचंड टीका हाेत आहे.
सोमवारी वाशी येथे झालेल्या खाटीक समाजाच्या मेळाव्यात बोलताना मंत्री नाईक यांनी सांगितले की,“मी देखील बिबट्याची पिल्ले आणि हरणाची पिल्ले पाळली होती. परंतु वनमंत्री झाल्यावर ही बाब कायदेशीर नाही म्हणून मी त्यांना सोडून दिले.”शिंदे गट शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर म्हणाले की, जर गणेश नाईक म्हणाले की, वनमंत्री झाल्यावर मी ती पिल्ले सोडून टाकली. तर याच दुसरा अर्थ असा होतो की, गणेश नाईक वनमंत्री झाले नसते तर त्यांनी ती पिल्ले स्वतःकडे ठेवली असती. असा दुसरा अर्थ त्यांच्या वक्तव्याचा होत आहे. जंगली प्राणी पाळणे अथवा आपल्याकडे ठेवणे हा गुन्हा आहे हे इतकी वर्ष शासनात वावरणाऱ्या मंत्र्याला माहीत नसणे याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे त्यांचे वक्तव्य करणे म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस आहे. मंत्री म्हणून ते कायद्याचे पालन करणारे असले तरी त्यांच्या अशा कबुलीजबाबाने चुकीचा संदेश जातो. या प्रकरणात मी वेळ पडल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे असे पाटकर म्हणाले. दरम्यान, वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ नुसार बिबट्या, हरिण यांसारख्या प्राण्यांना पाळण्याच्या गुन्ह्यासाठी तीन ते सात वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंडाची तरतूद आहे.
Forest Minister Ganesh Naik in trouble for his own statement that he had raised leopard cubs and deer cubs
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा