विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईच्या अंडर-19 संघाचा माजी खेळाडू आणि सध्या क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेला 26 वर्षीय बलवंत सिंह स्वरूप सिंह सोधा याला तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. डी.बी. मार्ग पोलिसांनी त्याला आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कप अंतर्गत 5 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमीफायनल सामन्याची तिकिटे चढ्या दराने विकल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मालाडचा रहिवासी असून तो क्रिकेट कोचिंगशी संबंधित आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 318 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टी-20 वर्ल्ड कप दरम्यान तिकिटांची अवैध विक्री आणि काळाबाजार केल्याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक झाली आहे.
तपासादरम्यान या रॅकेटचे धागेदोरे शिक्षण आणि क्रीडा प्रशासनाशी जोडले गेल्याचे संकेत मिळाले आहेत. अंधेरीतील एका नामवंत कॉलेजचा स्पोर्ट्स टीचर या प्रकरणाचा मुख्य आरोपी असल्याचे सांगितले जात आहे. तो मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सदस्य देखील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला मिळालेली कॉम्प्लिमेंट्री आणि पेड तिकिटे त्याने दलालांकडे सोपवली होती. हीच तिकिटे नंतर बाजारात अनेक पटींनी जास्त किमतीत विकली गेली.
अटक करण्यात आलेल्या सोधाच्या पार्श्वभूमीची चौकशी केली असता, तो 2019 पर्यंत मुंबईच्या अंडर-19 संघासाठी तो खेळत होता, एक उदयोन्मुख खेळाडू मानला जात होता. कालांतराने त्याने सक्रिय क्रिकेट सोडून कोचिंग सुरू केले. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याने अशा अनेक खेळाडूंसोबत क्रिकेट खेळले आहे, जे आज मोठ्या स्तरावर खेळत आहेत आणि याच संपर्कांचा वापर करून तो या रॅकेटमध्ये सामील झाला.
या रॅकेटचा खुलासा मार्चच्या सुरुवातीला झाला होता, जेव्हा डी.बी. मार्ग पोलिसांनी सर्वप्रथम माटुंगा येथील एका कॉलेजच्या शिपायाला संशयास्पद हालचालींमुळे ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून अंधेरीतील कॉलेजच्या स्पोर्ट्स टीचरचे नाव समोर आले आणि त्यानंतर एकामागून एक धक्कादायक माहिती समोर येत गेली. आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिकिटे विकण्याच्या जाहिराती देत असत आणि एक तिकीट 20 ते 25 हजार रुपयांना विकले जात होते. हे नेटवर्क खूप मोठे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून आगामी काळात या प्रकरणात आणखी काही अटकेची शक्यता आहे.
Former mumbai under-19 cricketer held for selling semifinal tickets at ₹25,000
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर