Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जवळच्या माणसांपासून सावध राहिले पाहिजे, गजानन कीर्तिकर यांचा सल्ला

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जवळच्या माणसांपासून सावध राहिले पाहिजे, गजानन कीर्तिकर यांचा सल्ला

Uddhav Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Uddhav Thackeray  उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊ शकतात. ते एकत्र यावेत अशी आमचीही इच्छा आहे. शिवसेनेचे तुकडे बघून आम्हालाही त्रास होतो, अशा माझ्या भावना आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जवळच्या माणसांपासून सावध राहिले पाहिजे आणि त्यांनी राज ठाकरेंना जवळ ठेवले पाहिजे, असा सल्ला शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केल्या. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तर बाळासाहेबांना ती खरी श्रद्धांजली ठरेल, असे विधान केले. Uddhav Thackeray

मुंबईत माध्यमांशी बोलताना कीर्तिकर म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात. आश्चर्य काही नाही. बाळासाहेब प्रयत्न करत होते. त्यांच्या हयातीमध्ये ते झालं नाही. ती खंत घेऊन ते गेले. आम्ही सुद्धा शिवसेनेतील जुनी माणसं. आमची पण ती इच्छा आहे. आम्हालाही ते वाटतं. कारण शिवसेनेचे तुकडे बघून आम्हाला खूप त्रास होतो.

ज्या शिवसेनेचे बाळासाहेब नेतृत्व करत होते. ती शिवसेना अशी दुभंगलेली बघून दुःख होतं. शिवसैनिकांना पण फार त्रास होतो. त्यांचे राजकीय भवितव्य कोलमडून गेलेलं आहे. त्यामुळे त्यांनी एकत्र यावे, ही गरज आहे. बाळासाहेबांना या दोन्ही बंधूंनी दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल. आमच्यासारखे जे नेते आहेत वयोवृद्ध झालेले त्यांचा आशीर्वाद मिळेल, अशा भावना गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केल्या.

राज ठाकरे दूर गेल्याची कारणे अनेक आहेत. उद्धव आता मोठे बंधू आहेत. बाळासाहेबांच्यानंतर शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे आणि एकत्र आणलं पाहिजे. बाळासाहेबांची सर्वांना सामावून घेण्याची कार्यपद्धती होती. कुणालाही नाराज न करण्याची. ज्याचं चुकलं असेल, त्याला समज देणं. अशी कार्यपद्धती उद्धवजींनी ठेवली पाहिजे”, असा वडिलकीचा सल्ला गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

त्यांनी जी जवळ केलेली माणसं आहेत, त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. त्यांचे जे गैरसल्ले असतात. त्यामुळे कार्यपद्धतीत अडचणी निर्माण होतात. ते त्यांनी सांभाळलं पाहिजे. राज ठाकरेंमध्ये राजकारणात चांगल्या पद्धतीने काम करण्याची कुवत आहे. त्यांना जवळ ठेवलं पाहिजे. त्यांचे बंधू आहेत, असे ते म्हणाले.

याच्यापुढे जाऊन कीर्तिकर म्हणाले, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले, तर शिवसेना भक्कम होईल. शत प्रतिशत स्वबळावर राज्य करण्याची इच्छा ज्यांना कुणाला झालेली आहे, त्यांची ती इच्छा पूर्ण होणार नाही, जर हे तिघे एकत्र आले तर पुन्हा ते वैभव मिळेल. एकत्र येऊन तर बघावे.

Gajanan Kirtikar advises Uddhav Thackeray to be careful of people close to him

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023