Suresh Dhas : बीड जिल्ह्यात गँग ऑफ वासेपूर, आमदार सुरेश धस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप

Suresh Dhas : बीड जिल्ह्यात गँग ऑफ वासेपूर, आमदार सुरेश धस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप

Suresh Dhas

विशेष प्रतिनिधी

बीड : बीड जिल्ह्यात कायदा राहिला नाही. कायदा-सुव्यस्था आहे की नाही हा प्रश्न पडला आहे. बीड जिल्ह्यात गँग ऑफ वासेपूर सुरू आहे” असा गंभीर आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. या सगळ्यांचे आका मंत्री धनंजय मुंडे असल्याचेही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना धस म्हणाले

मी कोणालाही टार्गेट करत नाही. मी राजीनामा देखील मागणार नाही. ते मुख्यमंत्री ठरवतील. तुम्ही कोणत्या दुनियेत आहात? तुम्ही कसे वागत आहात? तुमची स्टाईल कशी आहे धनु भाऊ. मी धनु भाऊ म्हणत आहे. तुम्हाला गांभीर्य नाही. माजी पालकमंत्र्यांकडे एकही मित्र राहिला नाही. विद्यमान खासदार बजरंग सोनावणे त्यांचे जिवलग मित्र होते. माजी पालकमंत्री पूर्वी फार चांगले होते. मात्र पाच वर्षात ते वेगळे वागत आहेत. असे का वागत आहेत हे माहीत नाही” असं सुरेश धस म्हणाले.

धस म्हणाले, आरोपी विष्णू चाटे हा आकाच्या खालचा छोटे आका आहे. पोलिसांनी पकडलं असं वाटत नाही, ते स्वत: सरेंडर झाले आहेत. यातला आका लवकरात लवकर आत गेला पाहिजे. हा आता 100 टक्के खंडणीचा गुन्हा राहिलेला नाही. 302 चे मुख्य सूत्रधार यामागे आहेत.संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना 15 दिवसांचा पीसीआर मिळाला ही समाधानाची बाब आहे. सीआयडी अधिकाऱ्यांना तपास करण्याची संधी मिळेल. काल रात्री सीएम साहेबांची सही झाली. आयजी लेव्हलचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्देवी, घाणेरड्या घटनेचा तपास करणार आहेत. याची न्यायालयीन चौकशी होईल.


मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर, बावनकुळे महसूल मंत्री, शिंदेंकडे नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम


“राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलय. प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यात नाही, तर राज्यभरात लोकांच्या मनात आहे. कोणाला ही घटना पटलेली नाही. मला वाटतं काल सर्वपक्षीय बैठक सुद्धा बीडला झाली आहे. काही निर्णय झालेत. बीड जिल्हा एकवटेल असं चित्र आहे, असे सांगून आमदार सुरेश धस म्हणाले, विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं. सीएम साहेबांच्या निर्णयापुढे किंवा निवेदनापुढे जाणारा मी कोण? इतकं सकारात्मक निवदेन कुठल्याही गृहमंत्र्याने किंवा मुख्यमंत्र्याने केलेलं नाही. आजपर्यंत कुठल्याही खुनाच्या घटनेत त्या कुटुंबाला मदत झालेली नाही. मोक्का लावतो हे स्वत: सीएमनी सांगितलं. ज्या एसपीनी कोणा आका-बाकाच ऐकून अराजकता माजवलेली, त्या एसपींना एकादिवसात हलवलं” अशा शब्दात सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांच कौतुक केलं.

हे जे वागले त्यामुळे 200 कुटुंब, व्यापारी गाव सोडून गेले. मारवाडी समाजाच्या कुठल्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही. परळीला जाऊन अराजकता बघा, लोकांच्या मुलाखती घ्या. लवकरात लवकर अटक करा. एसआयटी आज गठीत होईल. हे बिनभाड्याच्या खोलीत आत गेले पाहिजेत” अशी मागणी सुरेश धस यांनी केली.

मागच्या पालकमंत्र्यांनी त्यांचं पालकमंत्री पद भाड्याने दिलं होतं” असा टोला मारत धस म्हणाले, बीडचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारावा. अजित पवार जरी झाले तरी माझी हरकत नाही. पणहे दोघे पालकमंत्री होतील असे मला वाटत नाही.

आकाला मी घाबरत नाही. 9 तारखेला घटना घडली आणि आका त्याच परिसरात होता. आका 302 मध्ये देखील आहे. आका सध्या रिसॉर्ट बांधत आहे. शेतकऱ्यांना धमकी देऊन काम सुरू आहे” असा आरोप सुरेश धस यांनी केला. “परळी येथील दुबे प्रकरणात देखील आका आहेत. किती लाखात मिटले मला माहीत आहे. पीडित लोक माझ्याकडे येणार आहेत” असं सुरेश धस म्हणाले.

Gang of Wasseypur in Beed district, MLA Suresh Dhas serious allegations against Dhananjay Munde

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023