Girish Mahajan गिरीश महाजन म्हणतात..देवाला काळजी असेल तर पालक मंत्री होईल!

Girish Mahajan गिरीश महाजन म्हणतात..देवाला काळजी असेल तर पालक मंत्री होईल!

Girish Mahajan

विशेष प्रतिनिधी

नाशिक: नाशिक येथे कुंभमेळा झाला तेव्हा मी पालकमंत्री होतो,. पण आता होईल की नाही माहिती नाही. देवाला काळजी असेल तर होईल. देवाला म्हणजे ईश्वराला! असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

जलसंधारण मंत्री गिरीश महाजन नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंहस्थ बैठकी बाबत ते म्हणाले, २०२७ मध्ये कुंभमेळा येत आहे. मोठी तयारी करायची आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळचा कुंभ मेळा पुन्हा स्वच्छ आणि सुंदर, आरोग्यदायी करायचा आहे. मागील कुंभमेळा वेळेला मंत्री होतो, जलसंपदा मंत्री होतो आता ही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आताही तेच आहे . मागील वेळेस एकही मृत्यू झाला नाही, अतिशय सुंदर नियोजन झाले आहे. यावेळेस सुंदर नियोजन केले, चेंगराचेंगरी होणार नाही याची काळजी घेऊ. त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे नियोजनाला सुरुवात केली आहे. नदीत खराब पाणी जाणार नाही याची काळजी घेतो आहे. सगळे कामाला लागलो आहोत.

याच अनुषंगाने बोलताना ते म्हणाले, नाशिक येथे कुंभमेळा झाला तेव्हा मी पालकमंत्री होतो,. पण आता होईल की नाही माहिती नाही. देवाला काळजी असेल तर होईल. देवाला म्हणजे ईश्वराला! असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

नदी प्रदूषणाबाबत महाजन म्हणाले, काल याबाबत चर्चा झाली. 300 ते 400 कोटी खर्च येणार आहे. अतिक्रमण झाले आहे त्याअनुषंगाने सूचना दिल्या आहेत. त्र्यंबकेश्वर आणि नाशिकला yababt सूचना दिल्या आहेत प्रयागराज कुंभ गर्दी itski गर्दी आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे तेवढी मोठी व्यवस्था नाही. आपले कुंड छोटे आहेत. आपली आणि तिथली परिस्थिती वेगळी आहे

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते स्वामित्व योजनेतील लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्डचे वाटपही झाले. स्वामित्व योजननेवर ते म्हणाले, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रांतिकारी निर्णय घेतला आहे . आज सनद वाटपाचा कार्यक्रमचा शुभारंभ केला . नागरिकांचा अधिकार सुरक्षित करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. ग्रामीण भागातील प्रश्न, वाद यामुळे सुटतील..आर्थिक पत सुधारण्यासाठी, स्वत:ची प्रॉपर्टी सुरक्षित करण्यासाठी ही योजना महत्वाची आहे .

Girish Mahajan says..If God cares, I will be Guardian Minister!

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023