विशेष प्रतिनिधी
मुंबई : Gokul Jha कल्याण शहरातील नांदिवली भागात एका खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट तरुणीला अमानुष मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. एका परप्रांतीय पुरूषाकडून बेदम मारहाण होतानाचे संपूर्ण घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. हा प्रकार होण्याच्या अगोदर रिसेप्शनिस्ट तरुणीने एका महिलेला कानशिलात मारल्याचे उघड झाले आहे. ही महिला गोकुळची वहिनी आहे.
( Gokul Jha beats up a young receptionist for hitting his sister-in-law in the ear)
आरोपी गोकुळ झा हा मुलीचे केस पकडून तिला जमिनीवर आपटताना आणि तिला फरफटत नेताना दिसत आहे. पीडिता असलेली मराठी रिसेप्शनिस्ट तरुणी सोनाली हिने आधी एका महिलेला चपराक लगावली होती, असे एक फुटेज सध्या समोर आले आहे. या मारहाणीच्या घटनेआधी एक वेगळाच प्रकार घडला असल्याचे आता समोर आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
गोकुळ झा आणि काही मंडळी तेथील मराठी रिसेप्शनिस्ट तरूणीशी वाद घालत होते. त्यानंतर गोकुळ झा याने रिसेप्शन काऊंटरवर लाथ मारली. त्यामुळे रागाने लालबुंद झालेल्या मराठी तरूणीने आधी फाईल फेकली. त्यानंतर तिने रागाने पुढे येऊन तेथील एका महिलेला चपराक लगावली. त्यानंतर तो वाद चिघळला. नानम्तर गोकुळ झा याने त्या तरूणीला मारहाण केली.
मारहाणीच्या घटनेनंतर आरोपी गोकुळ झा हा फरार झाला होता. या प्रकरणी पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. पण रात्री गोकुळ झा याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर गोकुळ झा यांच्या आईने यासंबंधीचा प्रकार सांगितला. रिसेप्शनिस्ट तरूणीने गोकुळच्या वहिनीच्या कानशिलात लगावली होती, त्यामुळे गोकुळला राग आला.
Gokul Jha beats up a young receptionist for hitting his sister-in-law in the ear
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला