Konkan residents : कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडणार 5 हजार जादा गाड्या

Konkan residents : कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडणार 5 हजार जादा गाड्या

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5 हजार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.


मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती


गणपती उत्सवाच्या जादा वाहतूकीच्या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर तसेच एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थिती होते. सरनाईक यांनी यावेळी सांगितले की, “गणपती बाप्पा , कोकणवासी आणि एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी नफ्या -तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते. यंदा सुमार 5 हजार जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावणार आहेत. बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे उपलब्ध होणार आहे.”

नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी देखील एसटी महामंडळाने 5200 जादा बसेस सोडल्या होत्या. त्याला भाविक – प्रवाश्यांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे गणेशोस्तवासाठीदेखील एसटीने तब्बल 5 हजार जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, जादा बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणासोबतच गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे. गट आरक्षण 22 जुलैपासून सुरू होत आहे. तसेच 23 ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी 4300 बसेस सोडण्यात आल्या होत्या.

 

Good news for Conkan residents,ST Corporation will release 5 thousand additional trains for Ganpati festival

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023